मोठी अपडेट! 4 वी आणि 7 वी शिष्यवृत्ती अंतिम Answer key जाहीर – डायरेक्ट लिंक

Published On: May 29, 2026
Follow Us
MSCE Scholarship 4th 7th Final Answer key

MSCE Scholarship 4th 7th Final Answer key: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकताच 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घोषित केला आहे. आता प्राथमिक (इयत्ता ४थी) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची (MSCE Scholarship Final Answer key) जाहीर करण्यात आली आहे.

4 थी आणि 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा (MSCE Pune) रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभरात घेण्यात आली होती. या परीक्षेची तात्पुरती (अंतरिम) उत्तरसूची ७ मे २०२६ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर या तात्पुरत्या उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत आलेले आक्षेप आणि निवेदने परिषदेकडे प्राप्त झाली होती.

या आक्षेपांची गंभीर दखल घेत, विषय तज्ज्ञांकडून त्याचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार आवश्यक ते सर्व बदल करून आता ही सुधारित आणि अंतिम उत्तरसूची विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MSCE 4th 7th Scholarship Answer Key कुठे आणि कशी पाहायची?

ज्या विद्यार्थ्यांनी ४ थी आणि ७ वीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती, त्यांचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अधिकृत संकेतस्थळे उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना ही अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://puppssmsce.in आणि https://www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.

निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

सर्वप्रथम https://2026-2.puppssmsce.in/ या अधिकृत वेबसाईट वर जा आणि तिथे उजव्या बाजूला अंतिम उत्तरसूची एप्रिल २०२६ परीक्षा उत्तरसूची यावर क्लिक करा.

MSCE Scholarship Final answer key

आता तुम्ही प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 अंतिम उत्तरसूची (इयत्ता ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 अंतिम उत्तरसूची (इयत्ता ७ वी) परीक्षेची अंतिम उत्तरसूची (Answer Key) माध्यम आणि विषय निहाय पाहू शकता.

परीक्षा परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे (दिनांक २९ मे २०२६) स्पष्ट केले आहे की, आता या प्रसिद्ध झालेल्या अंतिम उत्तरसूचीतील उत्तरेच अंतिम समजण्यात येतील. यापुढे या उत्तरसूचीबाबत आलेली कोणतीही नवीन निवेदने किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत आणि त्याबाबत कोणताही पत्रव्यवहारही केला जाणार नाही.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, याच अंतिम उत्तरसूचीच्या आधारे विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.

MSCE PUP PSS Scholarship शिष्यवृत्तीसाठी निवड करण्याचे निकष काय आहेत? येथे पाहा

MSCE Scholarship 4th 7th Final Answer keyClick Here
MSCE Pune Official Websitehttps://mscepune.in/
Scholarship 4th 7th Official Websitehttps://2026-2.puppssmsce.in/
MSCE Scholarship Answer Key NotificationClick Here
MSCE PUNE Scholarship 4th 7th Final Answer key Notification
MSCE PUNE Scholarship 4th 7th Final Answer key Notification

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment