MHT CET PCM PCB Result Date Declared एमचटी सीईटी परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर

Published On: June 7, 2025
Follow Us
MHT CET PCM PCB Result Date Declared

MHT CET PCM PCB Result Date Declared महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. ०२ जून २०२५ रोजी जाहीर केलेल्या सूचनेनुसार, काही परीक्षांचे निकाल घोषित झाले आहेत, तर काही निकालांची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. LLB 5 Yr-CET,LLB 3 Yr-CET, B.BCA/BBA/BMS/BBM-CET या परीक्षांचे निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. आता MHT-CET-PCB, MHT-CET-PCM, B.Design-CET या परीक्षांच्या निकालाच्या तारखा आता CET Cell कडून जाहीर करण्यात आल्या आहेत.

MHT CET PCM PCB Result Date Declared

आत्तापर्यंत जाहीर झालेले निकाल खालीलप्रमाणे:

  • ०८ मे २०२५ रोजी निकाल लागलेल्या परीक्षा:
    • M.HMCT-CET
    • B.Ed-M.Ed-CET
    • M.Ed-CET
  • १५ मे २०२५ रोजी निकाल लागलेल्या परीक्षा:
    • B.HMCT/M.HMCT(Integrated)-CET
    • MCA-CET
    • B.P.Ed-CET
    • M.P.Ed-CET
    • MH Nursing-CET
    • DPN/PHN-CET
  • २८ मे २०२५ रोजी निकाल लागलेल्या परीक्षा:
  • 4 जून २०२५ रोजी निकाल लागलेल्या परीक्षा
  • B.BCA/BBA/BMS/BBM-CET
  • LLB 5 Yr-CET

अपेक्षित निकाल (संभावित तारखा)

  • B.Design-CET: ०९ जून २०२५ (संभावित)
  • MHT-CET-PCB: १६ जून २०२५ (संभावित)
  • MHT-CET-PCM: १६ जून २०२५ (संभावित)
  • LLB 3 Yr-CET: १७ जून २०२५ (संभावित)

संबंधित उमेदवारांनी या माहितीची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी, उमेदवार http://www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा cetcell@mahacet.org या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.

MHT-CET 2025 निकाल कसा व कोठे चेक करावा?

MHT-CET 2025 चे निकाल जाहीर झाल्यावर, ते तपासण्यासाठी तुम्हाला https://cetcell.mahacet.org/ (CET) सेलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

निकाल तपासण्यासाठी स्टेप:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: तुम्हाला http://www.mahacet.org या वेबसाइटवर जावे लागेल.
  2. निकाल लिंक शोधा: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला MHT-CET 2025 च्या निकालाशी संबंधित एक लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.
  3. लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा: लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख किंवा इतर आवश्यक माहिती विचारली जाऊ शकते. ही माहिती योग्यरित्या प्रविष्ट करा.
  4. निकाल पहा आणि डाउनलोड करा: तुमची माहिती सबमिट केल्यानंतर, तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तो निकाल पाहू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी डाउनलोड किंवा प्रिंट करून घेऊ शकता.

सध्या फक्त काही CET परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत आणि काही निकालांची प्रक्रिया सुरू आहे. MHT-CET-PCM आणि MHT-CET-PCB चे निकाल १६ जून २०२५ रोजी अपेक्षित आहेत.

MHT CET PCM PCB Result Date Declared

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment