BCA BBA BMS BBM CET 2025 पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी! अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा जाहीर

Published On: June 7, 2025
Follow Us
BCA BBA BMS BBM CET 2025

BCA BBA BMS BBM CET 2025 महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) बीसीए (BCA), बीबीए (BBA), बीएमएस (BMS), आणि बीबीएम (BBM) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २०२५ च्या अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे.

BCA BBA BMS BBM CET 2025

BCA BBA BMS BBM CET 2025 या अभ्यासक्रमांसाठीची मूळ सीईटी परीक्षा २९ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान घेण्यात आली होती आणि तिचा निकाल ४ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

काही विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत. या विद्यार्थ्यांचे पालक आणि संस्थांनी अतिरिक्त परीक्षा घेण्याची विनंती सीईटी कक्षाकडे केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन, शासनाने अतिरिक्त परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे.

या अतिरिक्त परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर संबंधित माहिती लवकरच CET कक्षाच्या अधिकृत वेबसाइट www.mahacet.org वर प्रसिद्ध केली जाईल. इच्छुक विद्यार्थी, पालक आणि संस्थांनी नवीनतम माहितीसाठी वेबसाइटला नियमितपणे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिलीप सरदेसाई (भा.प्र.से.), आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सहीने ही जाहीर सूचना निर्गमित करण्यात आली आहे.

BCA BBA BMS BBM CET 2025

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment