MAHAJYOTI JEE NEET MHT-CET Coaching Notice 2025-27 महाज्योती मोफत टॅब, इंटरनेटसह प्रशिक्षणासाठी अर्ज मुदत वाढली

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MAHAJYOTI JEE NEET MHT-CET Coaching Notice 2025-27 महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी! महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्यामार्फत JEE, NEET आणि MHT-CET बॅच 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांकडून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जात दुरुस्ती आणि कागदपत्रे आपलोड यासाठी 20 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाज्योती संस्थेने या परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २३ मे २०२५ रोजी एक महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. या शुद्धीपत्रकानुसार, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे.

MAHAJYOTI JEE NEET MHT-CET Coaching Notice 2025-27

योजनेचा तपशील आणि महत्त्वाचे बदल:

मोफत प्रशिक्षण आणि सुविधा: या योजनेअंतर्गत महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब आणि ६ GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे.

अर्ज करण्याची मुदतवाढ: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती (उदा. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे) करण्यासाठी दि. २०/०६/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याची लिंक दि. १५/०५/२०२५ रोजीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

नवीन गुणवत्ता निकष: या प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी मध्ये ६०% गुण असणे आवश्यक आहे, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ७०% गुणांची अट ठेवण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया: महाज्योती कार्यालयास उपलब्ध निधी आणि मा. संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार निर्धारित विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात प्राप्त अर्जांपैकी गुणानुक्रमे पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

संपर्क आणि कार्यालय: महाज्योती संस्थेचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा माळा, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंद पेठ, नागपूर – ४४० ०२२ येथे आहे. विद्यार्थी ०७१२-२९५९३८१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा mahajyotingp@gmail.com या ईमेल आयडीवर ईमेल करू शकतात.

सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी या बदलांची आणि मुदतवाढीची नोंद घ्यावी, असे आवाहन महाज्योती कडून जारी केलेल्या शुद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

MAHAJYOTI JEE NEET MHT-CET Coaching 2025-27 ऑनलाईन अर्ज, महत्वाचे तपशील संपूर्ण माहिती येथे वाचा

अधिक माहितीसाठी : शासन शुद्धीपत्रक डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाईट : https://mahajyoti.org.in/

MAHAJYOTI JEE NEET MHT-CET Coaching Notice 2025-27

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!