MHT CET PCM Group Re Exam List महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) कक्षाकडून MHT CET PCM Group Re Exam 27,837 विद्यार्थ्यांसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत जाहीर सूचना https://cetcell.mahacet.org/ संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
MHT CET PCM Group Re Exam संपूर्ण माहिती
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून 27 एप्रिल 2025 रोजी एमएचटी-सीईटी (PCM गट) ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या सकाळच्या सत्रात इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक चुका असल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केल्या.
या तक्रारी शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पोहोचल्यावर त्यांनी तातडीने दखल घेतली आणि संबंधित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी निर्देश दिले.
त्या पार्श्वभूमीवर या सत्रातील सर्व 27,837 विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही फेर परीक्षा 5 मे 2025 रोजी होणार असल्याची माहिती राज्य सीईटी कक्षाने दिली आहे.
MHT CET 2025 Admit Card Released Direct link to PCB Group Download
परीक्षेची माहिती थोडक्यात:
- एमएचटी-सीईटी PCM गटाची परीक्षा 19 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान झाली.
- 15 सत्रांत, एकूण 197 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली.
- 4,64,263 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 4,25,548 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
- 27 एप्रिलच्या सकाळी घेतलेल्या सत्रात इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमातून 27,837 विद्यार्थ्यांनी पेपर दिला.
- गणिताच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेत 21 प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे तज्ञांच्या पडताळणीत स्पष्ट झाले.
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच फेर परीक्षा घेतली जात आहे, असे स्पष्ट करत सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट www.mahacet.org वर वेळोवेळी अपडेट तपासण्याचे आवाहन केले आहे.
MHT CET PCM Group Re Exam List
List of Eligible Candidates for Re-examination of MHT-CET 2025 (PCM Group) on 05-May-2025
अधिक माहितीसाठी : https://cetcell.mahacet.org/
Mht cet exam chut gya re exam kb se hey