MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील 2,795 रिक्त पदे भरण्यासाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. MPSC कडून जाहीर करण्यात आलेली ही भरती सर्वात मोठी भरती आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, या संधीचा अधिकाधिक पात्र उमेदवारांनी अवश्य लाभ घ्यावा, संपूर्ण माहिती पाहूया.
Table of Contents
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025
महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरती करीता MPSC मार्फत जाहिरात देण्यात आली आहे.
रिक्त पदांचा तपशील
- पदाचे नाव: पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ
- वेतनश्रेणी :एस-२० रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. (Pashudhan Vikas Adhikari Salary)
- एकूण रिक्त जागा : 2,795
भरावयाच्या पदांचा सामाजिक/समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

महत्वाच्या तारखा
- अर्ज सादर करण्याचा कालावधी:
- दिनांक २९ एप्रिल, २०२५ रोजी १४.०० वाजता सुरू
- दिनांक १९ मे, २०२५ रोजी २३.५९ वाजता संपेल
- ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक:
- दिनांक १९ मे, २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
- भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची छपाई घेण्याचा अंतिम दिनांक:
- दिनांक १९ मे, २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:
- दिनांक २१ मे, २०२५ रोजी बँकांच्या कार्यालयीन वेळेमध्ये
आवश्यक पात्रता
उमेदवारांकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा

- महाराष्ट्र शासनाच्या कर्मचा-यांना उच्च वयोमर्यादा लागू नाही.
- मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, अनाथ, आ.दु.घ. आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकत्तम असलेली एकच सवलत देय राहील.
- असाधारण शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव किंवा दोन्ही धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा शिथिलक्षम राहील. परंतु, आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार जेव्हा मुलाखतीसाठी पुरेसे उमेदवार प्राप्त होत नसतील, तेव्हाच सदर तरतुद विचारात घेतला जाईल.
- अशा प्रत्येक प्रकरणी उपलब्ध उमेदवारांच्या उच्चतम शैक्षणिक अर्हतेच्या दोन स्तर उच्च शैक्षणिक अर्हताप्राप्त उमेदवारच वयोमर्यादेत सवलतीकरीता विचारात घेतले जातील.
- नुभवाच्या संदर्भात ज्या पदावरील किमान अनुभव मागितला असेल त्यापेक्षा वरिष्ठ पदावरील अनुभव वयोमर्यादा शिथिल करण्याकरीता विचारात घेतला जाईल.
शैक्षणिक अहर्ता
शैक्षणिक अर्हताः Possess Bachelor’s Degree in Veternary Science or Veterinary Science and Animal Husbandry. (भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, १९८४ च्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय अर्हता.)
शैक्षणिक अर्हता गणना करण्याचा दिनांक:- प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
राज्य पशुवैद्यक परिषद / भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा, १९८४ नुसार नोंदणी असणे आवश्यक असून नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे अनिवार्य आहे.
कर्तव्ये व जबाबदा-या:- प्रस्तुत पदाच्या कर्तव्ये व जबाबदा-या याबाबतचा तपशील आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
निवडप्रकिया
- जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
- जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
- चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
- चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
- चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
- मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
- प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया पशुधन विकास अधिकारी (सेवाप्रवेश नियम) दिनांक २२ डिसेबर, १९८८ अथवा तद्नंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणा-या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल. अथवा तद्नंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणा-या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
- अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणा-या उमेदवाराची क्रमवारी (Ranking) आयोगाच्या दिनांक १२ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल.
अर्ज करण्याची पध्दत – अर्ज सादर करण्याचे टप्पे
- आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापुर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile) तयार करणे.
- खाते तयार केलेले असल्यास व ते अदययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
- विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
- विहित प्रमाणपत्र/कागदपत्रे अपलोड करणे.
- प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवाराची पात्रता अजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करावी लागतील.

शुल्क (रुपये)
- अराखीव (खुला) – रुपये ३९४/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग रुपये २९४/-
- परोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
ऑनलाईन अर्ज
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ:- https://mpsconline.gov.in
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी : मूळ जाहिरात पीडीएफ येथे डाउनलोड करा