MPSC Pasusavardhan Sahayyak Ayukt Bharti 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील 3,11 रिक्त पदे भरण्यासाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची तारीख ९ जून २०२५ पर्यंत आहे.
MPSC Pasusavardhan Sahayyak Ayukt Bharti 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत 2,795 पदांची मोठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर आता ‘सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ’ या संवर्गातील 3,11 पदांच्या भरतीसाठी जाहिरात (क्रमांक १०५/२०२५) प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
रिक्त पदांचा तपशील
- पदाचे नाव: सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ’
- वेतनश्रेणी: स्तर एस-२२ रुपये ६०,०००/- ते रुपये १,९०,८००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
- एकूण रिक्त जागा: 3,11

पदांची संख्या आणि आरक्षण: एकूण ३११ पदांपैकी २१९ पदे आरक्षित असून, ९२ पदे अराखीव (खुला) प्रवर्गासाठी आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी २०४ पदे, महिलांसाठी ९३ पदे, खेळाडूंसाठी १४ पदे आणि अनाथांसाठी ३ पदे आरक्षित आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी एकूण १२ पदे आरक्षित असून, यामध्ये अंध/अल्पदृष्टी (०३), कर्णबधीरता (०३), अस्थिव्यंगता/शारीरिक वाढ खुंटणे/आम्ल हल्लाग्रस्त (०३), आणि स्वमग्नता/मंदबुद्धी/मानसिक आजार व एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व (०३) यांचा समावेश आहे. पदसंख्या आणि आरक्षणात शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज सादर करण्याचा कालावधी: २० मे, २०२५ रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते ०९ जून, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत.
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत: ०९ जून, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत.
- चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक: ११ जून, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत.
- चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत (बँकेत): १२ जून, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत.

वयोमर्यादा (०१ सप्टेंबर, २०२५ रोजी):
- किमान वय: १८ वर्षे.
- कमाल वय:
- अराखीव (खुला): ३८ वर्षे.
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ४३ वर्षे.
- प्राविण्य प्राप्त खेळाडू: ४३ वर्षे.
- माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी: सैनिकी सेवेचा कालावधी अधिक ३ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार: ४५ वर्षे. महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी उच्च वयोमर्यादा लागू नाही.
शैक्षणिक अर्हता आणि अनुभव:
- शैक्षणिक अर्हता: पशुवैद्यक शास्त्रातील स्नातकोत्तर पदवी.
- अनुभव: पदवी संपादन केल्यानंतर शासकीय विभाग किंवा औद्योगिक उपक्रमातील पशुसंवर्धनाचा किमान पाच वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पुरेशा प्रमाणात उमेदवार उपलब्ध नसल्यास अनुभवाचा कालावधी ४० टक्क्यांपर्यंत शिथिल केला जाऊ शकतो.
- शैक्षणिक अर्हता आणि अनुभव अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण असावा.
- राज्य पशुवैद्यक परिषद / भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा, १९८४ / महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १९७१ अन्वये नोंदणी असणे आणि नोंदणी क्रमांक अर्जात नमूद करणे अनिवार्य आहे.
अर्ज शुल्क:
- अराखीव (खुला): रुपये ७१९/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग: रुपये ४४९/- बँक चार्जेस आणि त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क नॉन-रिफंडेबल (परत न मिळणारे) आहे.
अर्ज करण्याची पध्दत – अर्ज सादर करण्याचे टप्पे
- आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापुर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile) तयार करणे.
- खाते तयार केलेले असल्यास व ते अदययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
- विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
- विहित प्रमाणपत्र/कागदपत्रे अपलोड करणे.
- प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवाराची पात्रता अजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करावी लागतील.

निवड प्रक्रिया: अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या जास्त असल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा चाळणी परीक्षा घेतली जाईल. चाळणी परीक्षा झाल्यास, चाळणी परीक्षेचे आणि मुलाखतीचे गुण एकत्रित विचारात घेतले जातील, अन्यथा केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे शिफारस केली जाईल. मुलाखतीमध्ये किमान ४१% गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
महत्वाचे मुद्दे:
- कोणत्याही आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच मिळेल.
- अर्जासोबत आवश्यक ती प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- दिव्यांग उमेदवारांनी स्वावलंबन पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID Card) सादर करणे अनिवार्य आहे.
- अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सुधारित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र आणि महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- परीक्षेच्या ठिकाणी मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास सक्त मनाई आहे.
- प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शिफारस/नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ:- https://mpsconline.gov.in
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
MPSC Official Website : https://mpsc.gov.in/