महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) जून परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड लिंक

Published On: June 14, 2026
Follow Us
MAHA TET June Hall Ticket 2026

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) जून 2026 संदर्भातील महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. यंदाच्या परीक्षेच्या नियोजित तारखेत बदल करण्यात आला असून, काही माध्यमांच्या उमेदवारांसाठी विशेष परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. MAHA TET June Hall Ticket (Admit Card) 2026 डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक आर्टिकल मध्ये दिली आहे.

MAHA TET Jun Exam 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 सुरुवातीला 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार होती. मात्र त्याच दिवशी राष्ट्रीय स्तरावरील NEET परीक्षा आयोजित होत असल्याने अनेक परीक्षा केंद्रांवर ताण निर्माण होण्याची शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता MAHATET 2026 परीक्षा रविवार, 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक

परीक्षेचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच राहणार असून पेपर 1 सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 या वेळेत घेतला जाईल. तर पेपर 2 दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी संबंधित वेळेनुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्र महत्त्वाची सूचना

यासोबतच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आणखी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. राज्यात बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती आणि सिंधी माध्यमातील परीक्षार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे या माध्यमांच्या उमेदवारांसाठी निवडक जिल्ह्यांमध्येच परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी आपले हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर परीक्षा केंद्राची माहिती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

maha tet exam jun 2026 notice

MAHA TET June Hall Ticket 2026 Download Link

महा टीईटी जून परीक्षेचे हॉल तिकीट 16 जून 2026 पासून ते 28 जून 2026 या कालावधीत डाउनलोड करता येणार आहे.

  • MAHA TET June Hall Ticket 2026 डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • सर्वप्रथम https://mahatet.in या वेबसाइटवर जा.
maha tet exam jun 2026 hall ticket login page
  • तिथे लॉगिन पेज वर क्लिक करा. तिथे अर्ज भरताना तयार केलेला नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकून लॉगिन करावे.
  • लॉगिन झाल्यानंतर स्क्रीनवर हॉल तिकीट दिसेल, ते डाउनलोड करून प्रिंट काढा.

हॉल तिकीटावरील उमेदवाराचे नाव, फोटो, परीक्षा केंद्र, परीक्षा दिनांक आणि वेळ यांची माहिती काळजीपूर्वक तपासावी. सर्व माहिती योग्य असल्यास Download किंवा Print Hall Ticket या पर्यायावर क्लिक करून हॉल तिकीट PDF स्वरूपात सेव्ह करावे. तसेच भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट काढून ठेवावी.

परीक्षेच्या दिवशी हॉल तिकीटासोबत वैध फोटो ओळखपत्र घेऊन जाणे अनिवार्य आहे. हॉल तिकीटाशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे हॉल तिकीट डाउनलोड होताच त्यावरील सर्व तपशील तपासून ठेवावेत.

उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर जाताना हॉल तिकीट आणि वैध फोटो ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. तसेच परीक्षा सुरू होण्यापूर्वी पुरेसा वेळ राखून केंद्रावर पोहोचावे. परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी.

Maha TET Exam महत्वाच्या अधिकृत लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE Pune)अधिकृत वेबसाईट
MAHA TET Admit CardDownload Link
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET)अधिकृत वेबसाईट

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment