MHT CET 2025 PCM Group Re Examination Eligible Candidates List Download

Published On: May 2, 2025
Follow Us
MHT CET 2025 PCM Group Re Examination Eligible Candidates List Download

MHT CET 2025 PCM Group Re examination Eligible Candidates List राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे की, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (PCM Group) परीक्षेच्या सकाळच्या सत्रातील सर्व उमेदवारांसाठी ५ मे २०२५ रोजी फेर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

या निर्णयामागील कारण म्हणजे इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत आलेल्या तांत्रिक त्रुटी. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या समस्यांची तातडीने दखल घेत त्यांना न्याय देण्याचे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले. त्यानुसार, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने तज्ञ समितीकडून प्रश्नपत्रिका तपासून घेतली असता २१ प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले.

परीक्षा संदर्भातील महत्त्वाची माहिती:

  • यावर्षी एमएचटी-सीईटी (PCM) गटाची परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान १५ सत्रांमध्ये १९७ परीक्षा केंद्रांवर पार पडली.
  • एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४,२५,५४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
  • २७ एप्रिलच्या सकाळच्या सत्रात इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांमधून २७,८३७ उमेदवारांनी सहभाग घेतला होता.

ही फेर परीक्षा फक्त २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सत्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांसाठीच आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी सूचना:

  • फेर परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी लवकरच mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
  • पात्र उमेदवारांनी ०५ मे २०२५ रोजी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
  • परीक्षेसंबंधित अधिक माहिती व अपडेटसाठी mahacet.org या वेबसाइटला नियमितपणे भेट द्यावी.

सीईटी कक्षाने उमेदवारांना आवाहन केले आहे की त्यांनी फेर परीक्षेस उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा.

MHT CET 2025 PCM Group Re Examination Eligible Candidates List Download

संपूर्ण यादी येथे पहा

MHT CET 2025 PCM Group Re Examination Eligible Candidates List Download

अधिकृत वेबसाईट : https://cetcell.mahacet.org/

MHT CET 2025 PCM Group Re Examination

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment