MHT CET 2025 Re Examination Notice – एमएचटी-सीईटी PCM Group ची फेर परीक्षा होणार,

Published On: May 1, 2025
Follow Us
MHT CET 2025 Re Examination Notice

MHT CET 2025 Re Examination Notice PCM Group राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ परीक्षेच्या सकाळच्या सत्रातील गणित विषयाच्या तांत्रिक अडचणीबद्दल cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा होणार आहे अशा 27,837 विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या अडचणींमुळे संबंधित परीक्षेची रद्दीकरण आणि फेर परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. फेर परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती आणि पुढील प्रक्रिया खालीलप्रमाणे दिली आहे.

MHT CET 2025 Re Examination Notice PCM Group

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी २०२५ ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक ०९ एप्रिल, २०२५ ते २७ एप्रिल, २०२५ या कालावधीत पार पाडली आहे.

सदर परिक्षेदरम्यान दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेमध्ये उमेदवारांना गणित विषयाशी संबंधीत तांत्रिक अडचणी उद्भवल्याबाबत उमेदवारांनी ई-मेल, पत्र, टिकीट सिस्टम, दुरध्वनी आणि प्रत्यक्ष सीईटी कक्षास भेट देवून पालक/ उमेदवारांनी आक्षेप/ तक्रारी नोंदविल्या आहेत.

उमेदवार/ पालक यांच्या तक्रारीची दखल घेवून तसेच उमेदवरांच्या शैक्षणिक हित लक्षात घेता पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

MHT CET PCM Group Re Exam List : या 27,837 विद्यार्थ्यांची यादी जाहीर, परीक्षा 5 मे रोजी होणार

  • दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
  • त्याचप्रमाणे दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेली आहे, अशा परीक्षेकरीता उपस्थित सर्व उमेदवारांची फेरपरीक्षा दिनांक ०५ मे. २०२५ रोजी घेण्यात येणार आहे, याची संबंधीत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.
  • सदर परीक्षेस उपस्थित राहीलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना फेरपरीक्षा देणे अनिवार्य असेल.
  • सदर फेर परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
  • उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी राज्य सीईटी कक्षाच्या संकेतस्थळ www.mahacet.org वर नियमितपणे भेट द्यावी.
MHT CET 2025 Re Examination Notice

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment