MHT CET Result 2025 महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) परीक्षा वेगवेगळ्या दिवसांमध्ये आणि वेगवेगळ्या वेळेत (shift) संपन्न होत आहे. प्रत्येक shift मध्ये प्रश्नपत्रिका वेगळी असून, प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असल्यामुळे, त्यांची काठिण्य पातळी (difficulty level) वेगवेगळी असू शकते. त्यामुळे cetcell.mahacet.org. result निकाल तयार करण्यासाठी PCM आणि PCB ग्रुपसाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे.
Table of Contents
MHT CET Result 2025 नवीन निकाल प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा कक्ष (State Common Entrance Test Cell, Maharashtra) ने MHT CET 2025 परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. यावर्षी MHT CET Result 2025 निकाल प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि विविध सत्रांमध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना समसमान न्याय मिळावा यासाठी Normalization Method (सामान्यीकरण पद्धत) लागू करण्यात आली आहे.
MHT CET 2025 साठी परीक्षार्थ्यांचे गुण ११वी व १२वी च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिकांवर घेतले जातील. या प्रक्रियेत उमेदवाराच्या गुणांचे सामान्यीकरण केले जाईल, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समसमान न्याय मिळेल.
MHT CET 2025 Admit Card Released Direct link to PCB Group Download
MHT CET 2025 Normalization Process म्हणजे काय?
MHT CET ही संगणकाधारित परीक्षा (Computer-Based Test – CBT) असून, मोठ्या संख्येने उमेदवार असल्यामुळे परीक्षा वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक सत्रातील प्रश्नपत्रिका समान काठिण्यपातळीची नसते. यामुळे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स सत्रांमुळे अधिक किंवा कमी होऊ शकतात.
हे टाळण्यासाठी, परीक्षेच्या Normalization पद्धतीचा वापर केला जातो. हीच पद्धत JEE Main, NEET, इत्यादी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये वापरली जाते.
MHT CET Free Mock Test 2025: Coursewise Mocktest Direct link
Normalization पद्धतीची सूत्रे (Technical Details)
- Raw Score म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मिळवलेले गुण.
- Normalized Score म्हणजे परीक्षेच्या सर्व सत्रांमधून गुणांची सरासरी आणि प्रसरण (mean आणि standard deviation) वापरून तयार केलेले स्केल गुण.
- गणिती सूत्रांनुसार सर्व उमेदवारांना एकसंध स्केलवर आणले जाते, त्यामुळे निकालात कोणत्याही सत्राचा अन्यायकारक फायदा किंवा तोटा होत नाही.
नॉर्मलायझेशन आणि Percentile गुण काढण्याची प्रक्रिया
- विद्यार्थ्यांचे विभाजन: विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवसांमध्ये आणि प्रत्येक दिवसात दोन सत्रांमध्ये विभागले जाते. प्रत्येक सत्रात साधारणपणे समान संख्येत विद्यार्थी असतात.
- प्रत्येक सत्राचा निकाल: प्रत्येक सत्राचा निकाल Raw Scores आणि Percentile Scores च्या स्वरूपात तयार केला जातो. हे गुण गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि एकूण गुणांसाठी (Total) स्वतंत्रपणे काढले जातात.
- CET गुणांचे संकलन: चारही सत्रांतील एकूण गुणांचे Percentile गुण एकत्र करून CET गुण तयार केले जातात. हे गुण निकाल तयार करण्यासाठी वापरले जातात.
गुण कसे मोजले जातील?
- PCM/PCB साठी वेगवेगळ्या सत्रांची गणना केली जाईल.
- प्रत्येक सत्रातील “Mean” आणि “Standard Deviation” वापरून normalization formula लावली जाईल.
- अंतिम निकाल “Percentile” स्वरूपात जाहीर केला जाईल – म्हणजे तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठे उभे आहात ते स्पष्ट होईल.
PDF मध्ये प्रत्येक सत्रातील विद्यार्थ्यांचे Raw Score आणि Percentile गुणांचे विभाजन दर्शविणारी तालिका (Table) दिली आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याचे रोल नंबर, प्रत्येक विषयातील गुण आणि Percentile गुण दर्शविले आहेत.
उदाहरण

Maharashtra HSC Result 2025 लवकरच अधिकृत वेबसाइटवर @mahresult.nic.in स्कोअरकार्ड रोल नंबरनुसार शोधा
निकाल प्रक्रिया आणि कॅल्क्युलेशनमध्ये काय काय समाविष्ट?
घटक | वर्णन |
---|---|
परीक्षेचा प्रकार | संगणकावर आधारित CBT |
सत्र आधारित परीक्षा | होय |
सामान्यीकरण (Normalization) | होय |
अंतिम स्कोअर | Percentile नुसार |
वापरले जाणारे घटक | Mean, Standard Deviation, Raw Scores |
निकालासाठी वापरलेले सूत्र | [(उमेदवाराचा स्कोअर – सत्रातील सरासरी) / सत्रातील प्रसरण] |
महत्वाच्या सूचना
- कोणत्याही शंका असल्यास CET CELL शी संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाईटवर अपडेट्स तपासत राहावेत.
- CET CELL कडून प्रसिद्ध झालेला Normalization Methodology PDF नीट वाचावा.
- निकाल तयार करण्याची पद्धत समजून घेणे आवश्यक आहे, विशेषतः प्रवेश प्रक्रियेत याचा प्रभाव मोठा असतो.
अधिक माहितीसाठी: Normalization document for MHTCET( PCM & PCB)- 2025
अधिकृत वेबसाइट: https://cetcell.mahacet.org