Paricharika Awards परिचारिका दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला, यावेळी राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार विजेत्या परिचारिका यांना गौरविण्यात आले, संपूर्ण यादी खाली दिलेली आहे. या कार्यक्रमा दरम्यान आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मोठी घोषणा केली.
Table of Contents
Paricharika Awards 2025
परिचारिका दिनाचे औचित्य

Paricharika Din 12 मे रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. यावर्षीचे घोषवाक्य होते – “परिचारिकांची काळजी घ्या, अर्थव्यवस्था मजबूत करा.”
कार्यक्रमात राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
परिचारिका प्रशिक्षणात वाढ
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, सध्या राज्यात ३५ एएनएम आणि २३ जीएनएम प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.
नागपूर, पुणे, ठाणे, जालना येथे वेगवेगळ्या प्रकारचे नर्सिंग शिक्षण सुरू आहे.
नवीन संस्थांमध्ये इचलकरंजी, सातारा, सिंधुदुर्ग व नाशिक येथे सुरू होणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्हा वैद्यकीय हब होण्याच्या वाटेवर
खासदार धैर्यशील माने यांनी नमूद केले की, “परिचारिका हा व्यवसाय नसून एक सेवाव्रत आहे. या सेवेच्या आधुनिकीकरणासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत. कोल्हापूर व मिरज भागात उत्तम आरोग्य सुविधा आहेत आणि कोल्हापूरला वैद्यकीय हब बनवण्यासाठी पावले उचलली जात आहेत.”
सामूहिक प्रतिज्ञा
कार्यक्रमात उपस्थित सर्व परिचारिकांनी हातात दिवे घेऊन सामूहिक प्रतिज्ञा घेतली आणि सेवेची नवी शपथ घेतली.’
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा!
ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात येते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागातील इतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.
पुरस्कार विजेत्या परिचारिका संपूर्ण यादी
Paricharika Awards राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार विजेत्या परिचारिका संपूर्ण यादी खालीलप्रमाणे
- आधिसेविका गट : रमा गोविंदराव गिरी, जिल्हा रुग्णालय, बीड
- आधिसेविका गट : डॉ. शुभांगी नामदेवराव थोरात, जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर
- सहाय्यक अधिसेविका गट : आशा वामनराव बावणे, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली
- सहाय्यक अधिसेविका गट : वंदना विनोद बरडे, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा, जिल्हा चंद्रपूर
- सहाय्यक अधिसेविका गट : उषा चंद्रकांत बनगर, उपजिल्हा रुग्णालय, अंबरनाथ, जिल्हा ठाणे
- सार्वजनिक आरोग्य परिचारिका गट : ममता किशोर मनठेकर, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला
जिल्हास्तरीय पुरस्कार विजेत्या
तसेच याठिकाणी कोल्हापूर जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. यातील विजेते खालीलप्रमाणे
जीएनएम संवर्ग:
- प्रथम : कल्पना रमेश रत्नाकर, वसाहत रुग्णालय, गांधीनगर
- द्वितीय : जयश्री रणवरे, सेवा रुग्णालय, कसबा बावडा
- तृतीय : सुद्धा उत्तम बरगे, उपजिल्हा रुग्णालय, कोडोली
- चतुर्थ : विद्या शशिकांत गिरी, सेवा रुग्णालय, कसबा बावडा
एलएचव्ही संवर्ग:
- प्रथम : उमा शहाजी बोते, प्राथमिक आरोग्य केंद्र, हुपरी
- द्वितीय : गौरी केशव कारखानिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, बांबवडे
- तृतीय : सुनिता धनाजी देसाई, प्राथमिक आरोग्य केंद्र, कडगाव
एएनएम संवर्ग:
- प्रथम : मनीषा भोपाल कांबळे, उपकेंद्र रुकडी, पी.आ.केंद्र हेर्ले
- द्वितीय : अश्विनी शिवाजी वारके, उपकेंद्र म्हासरंग, पी.आ.केंद्र पाटगाव
- तृतीय : मीता भिमसी पवार, उपकेंद्र बोरबेट, पी.आ.केंद्र गारिवडे
- चतुर्थ : शुभांगी लक्ष्मण पाटील, उपकेंद्र तांबुळवाडी, पी.आ.केंद्र माणगाव
पुरस्कार वितरण सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक-१ डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक-२ डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. दिलीप माने, सहाय्यक संचालक डॉ. नीलिमा सोनावणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी आणि पुरस्कार प्राप्त परिचारिका उपस्थित होत्या.