RTE Admission Waiting List: आरटीई (RTE) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ साठी निवड यादी जाहीर झाली असून, पात्र बालकांच्या पालकांसाठी आता प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ज्या विद्यार्थ्यांची निवड पहिल्या यादीत झाली आहे, त्यांना १० एप्रिल २०२६ ते ८ मे २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता प्रतीक्षा यादीतील मुलांसाठी महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकांनी केवळ SMS ची वाट न पाहता आरटीई पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती‘ या टॅबवर जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.
RTE Admission Waiting List महत्त्वाच्या सूचना
ज्या विद्यार्थ्यांचे नाव पहिल्या निवड यादीत आलेले नाही, अशा पालकांनी गोंधळून न जाता RTE Admission Waiting List मधील आपला क्रमांक तपासून पाहावा.
यादीत नाव पाहण्यासाठी आरटीई पोर्टलवर Waiting List/ प्रतीक्षा यादी या टॅबवर वर्ष आणि जिल्हा निवड करून तुम्ही जिल्हा निहाय यादीत नाव पाहू शकता तसेच यादीतील Priority No किती आहे? हे पाहून तुम्हाला वेटिंग लिस्ट मध्ये नाव किती नंबरला आहे. हे चेक करू शकता.

प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश कधी मिळणार?
RTE Portal वर ‘अर्जाची स्थिती‘ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तिथे आपला अर्ज क्रमांक लिहून तुम्ही प्रतीक्षा यादीतील स्थिती पाहू शकता. महत्त्वाचे म्हणजे, निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशाची संधी मिळत नाही.

निवड यादीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर म्हणजेच दिनांक ८ मे नंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी RTE Admission Waiting List मधील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रमानुसार एसएमएस पाठवले जातील. तोपर्यंत पालकांनी संयम राखून पोर्टलवर अपडेट्स चेक करत राहावे.
ज्या मुलांची निवड झाली आहे, त्यांच्या पालकांनी अर्जात नमूद केलेल्या सर्व मूळ कागदपत्रांच्या प्रति आणि साक्षांकित सत्यप्रती सोबत ठेवाव्यात. तसेच, अलॉटमेंट लेटर आणि आरटीई पोर्टलवर उपलब्ध असलेले हमीपत्र यांची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे जाणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टल ला भेट द्या : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
RTE 25% Admission Status: प्रवेशाची सद्यस्थिती आणि शिल्लक जागा
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत यावर्षी राज्यभरातून एकूण २,८९,२८६ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमधून लॉटरीद्वारे पहिल्या टप्प्यात १,०५,८११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ७९,५५१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.
आता शिल्लक जागांचा विचार करता, पहिल्या निवड यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अजून २६,२६० जागांवर प्रवेश होणे बाकी आहे. जर हे विद्यार्थी दिलेल्या मुदतीत (८ मे २०२६ पर्यंत) प्रवेश करू शकले नाही, तर या रिक्त जागा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या RTE 25% Admission Status नुसार ८६,०३४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, ज्यांना पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संधी मिळू शकते.
- एकूण प्राप्त अर्ज : २,८९,२८६
- निवड झालेले विद्यार्थी (Selection) : १,०५,८११
- आतापर्यंत झालेले प्रवेश (Admitted) : ७९,५५१
- प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी (Waiting) : ८६,०३४
पालकांनी आरटीई पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर लक्ष ठेवून आपल्या पाल्याच्या प्रवेशाबाबत अपडेट राहावे.









