आरटीई २५ टक्के प्रवेश भाडेकराराबाबत शिक्षण विभागाचे स्पष्ट सूचना

Published On: April 20, 2026
Follow Us
RTE 25 Admissions Rental Agreements

RTE 25 Admissions Rental Agreements: आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी भाडेकराराबाबत शिक्षण संचालनालयाने अत्यंत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जर तुम्ही भाडे तत्त्वावर राहत असाल आणि आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणार असाल, तर खालील तांत्रिक बाबी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

आर.टी.ई. प्रवेशासाठी भाडेकराराचा नियम अतिशय कडक असून, तो प्रवेश प्रक्रिया किंवा अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वीच तयार केलेला असावा लागतो. अनेक पालकांचे प्रवेश केवळ कराराच्या तारखेतील त्रुटीमुळे पडताळणी समितीकडून प्रलंबित ठेवले जात आहेत. संचालनालयाच्या सुधारित सूचनांनुसार, भाडे करार हा ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेच्या आधीचाच असावा, तरच तो वास्तव्याचा वैध पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल.

RTE 25 Admissions भाडेकराराबाबत महत्त्वाचे नियम

  • नोंदणीकृत करार: भाडे करार हा केवळ साध्या कागदावर नसावा, तर तो दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत (Registered) असावा.
  • कालावधी: सदर भाडेकराराचा कालावधी किमान ११ महिने किंवा त्यापेक्षा जास्त असावा.
  • कागदपत्रांची प्राथमिकता: जर तुमच्याकडे रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, वीज बिल किंवा बँक पासबुक यांसारखे रहिवासी पुरावे उपलब्ध नसतील, तरच भाडे करार हा अंतिम पर्याय म्हणून वापरता येतो.
  • पडताळणी: निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशावेळी पडताळणी समिती या कराराची तारीख बारकाईने तपासेल. जर करार अर्ज भरल्यानंतरच्या तारखेचा असेल, तर प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येऊ शकतात.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आरटीई (RTE) २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे.

१. अनिवार्य कागदपत्रे (सर्वांसाठी)

ही कागदपत्रे प्रत्येक प्रवर्गातील बालकांसाठी आवश्यक आहेत:

रहिवासाचा पुरावा: रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यांपैकी कोणतेही एक

भाडेकरूंसाठी: जर स्वतःचा रहिवासी पुरावा नसेल, तर दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत ११ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचा भाडेकरनामा (प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा) आवश्यक आहे.

जन्मतारखेचा पुरावा: ग्रामपंचायत/न.पा./म.न.पा. दाखला, अंगणवाडी/बालवाडी रजिस्टरमधील दाखला किंवा पालकांचे प्रतिज्ञापत्र

आधार कार्ड: बालक किंवा पालकांचे आधार कार्ड किंवा आधार नोंदणीची पावती. आधार नसल्यास ९० दिवसांच्या आत ते शाळेत सादर करण्याच्या अटीवर तात्पुरता प्रवेश दिला जातो.

२. प्रवर्गानुसार आवश्यक कागदपत्रे

अ) सामाजिक वंचित गट

जातीचा दाखला: बालकाचा किंवा वडिलांचा महाराष्ट्र राज्यातील जातीचा दाखला (परराज्यातील दाखला ग्राह्य नाही)

दिव्यांग बालके: ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.

एच.आय.व्ही. बाधित/प्रभावित: जिल्हा शल्य चिकित्सक किंवा शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र.

ब) आर्थिक दुर्बल घटक (EWS)

उत्पन्नाचा दाखला: पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असलेला तहसीलदार स्तरावरील दाखला.

३. विशेष प्रवर्गासाठी अतिरिक्त कागदपत्रे

  • घटस्फोटित महिला न्यायालयाचा निर्णय आणि रहिवासी पुरावा.
  • प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचा पुरावा आणि आईचा रहिवासी पुरावा.
  • विधवा महिलापतीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि आईचा रहिवासी पुरावा.
  • अनाथ बालकेअनाथालयाची कागदपत्रे किंवा सांभाळ करणाऱ्यांचे हमीपत्र.
  • कोविड प्रभावितपालकांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि मृत्यू कोविडमुळेच झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र (कालावधी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२).

अधिकृत माहितीसाठी: RTE 25 टक्के प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे PDF यादी डाउनलोड करा

अधिकृत वेबसाईट: https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

RTE 25% Admission Rental Agreements

RTE Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment