राज्यातील दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी यासाठी Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 अंतर्गत आरटीई 25 टक्के प्रवेश योजना राबवली जाते. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत इयत्ता पहिली व पूर्व-प्राथमिक स्तरावर 25% जागांवर मोफत प्रवेश देण्याबाबत शासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
या लेखात आपण RTE Admission Online Application 2026-27, अर्ज करण्याची तारीख, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज लिंक, लॉटरी प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सूचना सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
आरटीई प्रवेश 2026-27 कधी सुरू होणार? (RTE Admission Start Date)
शासन निर्णयानुसार, आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. पालकांना दिलेल्या कालावधीतच अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.
- RTE Admission Start Date: १७ फेब्रुवारी २०२६
आरटीई प्रवेश 2026-27 शेवटची तारीख (RTE Admission Last Date)
आरटीई ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2026 आहे. शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे पालकांनी शक्यतो लवकर अर्ज पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
- आरटीई प्रवेश 2026-27 शेवटची तारीख (RTE Admission Last Date): १० मार्च २०२६
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू – कोण पात्र आहे?
आरटीई अंतर्गत खालील घटकांतील बालके पात्र ठरतात.
सामाजिक वंचित घटक
- अनुसूचित जाती (SC)
- अनुसूचित जमाती (ST)
- विमुक्त जाती (VJ-A)
- भटक्या जमाती (B, C, D)
- OBC / SBC
- दिव्यांग बालके
- HIV बाधित / प्रभावित बालके
- अनाथ बालके
- घटस्फोटीत / विधवा महिलांची बालके
आर्थिक दुर्बल घटक
- पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी
RTE Admission Documents List | आवश्यक कागदपत्रांची यादी
ऑनलाइन अर्ज करताना खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- पालकांचे आधार कार्ड
- बालकाचा जन्म दाखला
- रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / वीज बिल / भाडेकरार इ.)
- उत्पन्न दाखला (₹1 लाखांपेक्षा कमी – 2023-24 किंवा 2024-25)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्यांग प्रमाणपत्र (40% पेक्षा जास्त असल्यास)
- अनाथ बालक असल्यास संबंधित प्रमाणपत्र
- घटस्फोट / विधवा / सिंगल पॅरेंट संबंधित कागदपत्रे
चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकतो.
शाळा निवड व अंतर नियम
- पालकांना कमाल 10 शाळांची निवड करता येते
- शाळा घरापासून 1 किमी अंतराच्या आत असणे आवश्यक
- गुगल मॅपच्या आधारे अंतर निश्चित केले जाते.
आरटीई 25% प्रवेश पात्र शाळा यादी 2026: जिल्हा, तालुका निहाय लिस्ट मोबाईलवर असे चेक करा
लॉटरी (सोडत) प्रक्रिया कशी असेल?
- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन लॉटरी (Lottery) काढली जाईल
- लॉटरी एकाच टप्प्यात होणार
- प्रतीक्षा यादी (Waiting List) तयार केली जाईल
- SMS द्वारे पालकांना सूचना दिली जाईल
- अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून ठराविक मुदतीत शाळेत प्रवेश घ्यावा लागेल
महत्त्वाच्या सूचना पालकांसाठी
- एकाच बालकासाठी एकच अर्ज स्वीकारला जाईल
- यापूर्वी आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही
- केवळ SMS वर अवलंबून न राहता पोर्टल नियमित तपासा
- मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 1 ली, LKG, SKG आणि प्ले ग्रुप वयोमर्यादा निश्चित
RTE Admission Online Application Link
आरटीई प्रवेशासाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
RTE Admission Online Application Link:
https://student.maharashtra.gov.in/adm_portal
याच पोर्टलवरून शाळांची यादी, अर्ज स्थिती, लॉटरी निकाल आणि अलॉटमेंट लेटर पाहता येईल.
आरटीई योजना ही समाजातील दुर्बल घटकांसाठी शिक्षणाची मोठी संधी आहे. (RTE Admission Online Application 2026-27) प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व ऑनलाइन असल्याने पालकांनी दिलेल्या तारखांमध्ये अर्ज करून योग्य कागदपत्रांसह प्रवेश सुनिश्चित करावा. वेळेत अर्ज, अचूक माहिती आणि पोर्टलवरील सूचनांचे पालन केल्यास आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळण्याची संधी निश्चित वाढते.
अधिक माहितीसाठी : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया परिपत्रक डाउनलोड करा
RTE 25% प्रवेशासाठी शुल्क प्रतिपूर्ती दर जाहीर – शासन निर्णय







