आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, डायरेक्ट लिंक

Published On: February 17, 2026
Follow Us
RTE Online Form 2026-27

RTE Online Form 2026-27: महाराष्ट्र राज्यात दुर्बल व वंचित घटकातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 अंतर्गत आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या कायद्यानुसार स्वयं अर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे.

शालेय शिक्षण विभागाने याबद्दलच्या सुधारित सूचना जाहीर केल्या असून, 17 फेब्रुवारीपासून पालकांना आपल्या मुलांचे अर्ज ऑनलाईन भरता येणार असून, 10 मार्च 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या लेखात आपण (RTE Online Form 2026-27) कसा भरायचा, पात्रता काय आहे आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या, याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय?

आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांना इयत्ता पहिली किंवा पूर्व-प्राथमिक वर्गात 25 टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. ही आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया स्वयं अर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांसाठी लागू आहे.

या अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी शासनामार्फत शुल्क प्रतिपूर्तीचा दर निश्चित करण्यात येतो. त्यामुळे पालकांवर कोणताही आर्थिक बोजा पडत नाही.

आरटीई  25% प्रवेशासाठी पात्रता काय आहे?

शासनाच्या नियमांनुसार, ‘वंचित’ आणि ‘दुर्बल’ अशा दोन गटांतर्गत पालकांना अर्ज करता येतो. यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

वंचित गट: यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती (A), भटक्या जमाती (B, C, D), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC) यांचा समावेश होतो. तसेच एचआयव्ही बाधित/प्रभावित बालके, अनाथ बालके, दिव्यांग आणि कोविड प्रभावित बालके देखील या गटातून अर्ज करू शकतात.

आर्थिक दुर्बल गट: ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांचा समावेश आर्थिक दुर्बल गटामध्ये होतो.

आरटीई 25 टक्के प्रवेश कागदपत्रे यादी

RTE Admission Start Date आणि महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 फेब्रुवारी 2026
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 मार्च 2026
  • अर्ज पद्धत: पूर्णपणे ऑनलाईन
  • प्रवेशाचे वर्ष: २०२६-२७

आरटीई प्रवेश 2026-27 अर्ज प्रक्रिया (Step-by-Step)

आरटीई प्रवेश 2026-27 अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून पालकांनी खालील टप्पे काळजीपूर्वक पूर्ण करावेत.

  • अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा
  • बालकाची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
    • अर्जासोबत रहिवासी पुरावा, जातीचा दाखला (लागू असल्यास), उत्पन्नाचा दाखला आणि जन्माचा दाखला यासारखी आवश्यक कागदपत्रे अचूक जोडावीत.
  • निवासस्थानापासून 1 किमी अंतरातील शाळांची यादी तपासा
    • पालकांना त्यांच्या राहत्या घरापासून 1 किलोमीटर अंतराच्या आतील (हवाई अंतर) शाळा पोर्टलवर दिसतील. यापैकी जास्तीत जास्त 10 शाळांची निवड तुम्ही करू शकता.
  • विचारपूर्वक कमाल 10 शाळांची निवड करा
  • अर्ज सबमिट करून पावती जतन करा

पूर्ण व अचूक माहिती भरलेला (RTE Online Form 2026-27) च ग्राह्य धरला जाणार आहे.

आरटीई 25% प्रवेश पात्र शाळा यादी 2026: जिल्हा, तालुका निहाय लिस्ट मोबाईलवर असे चेक करा

आरटीई प्रवेश 2026-27 अर्ज प्रक्रिया: पालकांसाठी विशेष सूचना

अनेकदा अपूर्ण माहितीमुळे किंवा चुकीच्या कागदपत्रांमुळे अर्ज बाद होतात. त्यामुळे अर्ज भरताना घाई करू नका. शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, विहित मुदतीत परिपूर्ण भरलेला अर्जच ग्राह्य धरला जाईल.

ही योजना गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी संजीवनी आहे. त्यामुळे तुमच्या आसपास कोणी गरजू पालक असतील, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. लक्षात ठेवा, १० मार्च ही अर्जाची अंतिम तारीख आहे!

आरटीई अंतर्गत राबवली जाणारी ही योजना समाजातील दुर्बल घटकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी दिलेल्या कालावधीतच (RTE Online Form 2026-27) भरून आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा हक्क सुनिश्चित करावा. योग्य माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि विचारपूर्वक शाळा निवड केल्यास आरटीई प्रवेश 2026-27 प्रक्रिया सोपी आणि यशस्वी होऊ शकते.

हीच अधिकृत RTE Admission Online Application Link असून, याच पोर्टलवरून RTE Online Application Maharashtra अंतर्गत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

RTE Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment