राज्यातील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांसाठीची लॉटरी सोडत अखेर जाहीर झाली असून, प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी मोठा उत्साह दाखवला असून, राज्यातील एकूण ८,७०१ शाळांमधील जागांसाठी सुमारे २ लाख ८९ हजार अर्ज आले होते. त्यापैकी १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची पहिल्या निवड यादीत निवड झाली आहे. आता ज्या पालकांच्या मुलांचा नंबर लागला नसेल किंवा वेटिंग लिस्ट मध्ये असेल, त्यांच्यासाठी आरटीई दुसरी लॉटरी यादी कधी लागणार? याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.
आरटीई (RTE) २५% प्रवेश प्रक्रिया २०२६-२७
राज्यातील आरटीई प्रवेशासाठीची पहिली निवड यादी जाहीर झाली असून, त्यातील महत्त्वाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
- एकूण प्राप्त अर्ज: २,८९,२८६
- एकूण रिक्त जागा: ११४८२६
- निवड झालेले विद्यार्थी (Selection List): १,०५,८११
- शिल्लक जागा: ९०१५
- प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी (Waiting List): ८६,०३४
- प्रवेशाची अंतिम मुदत: १०/०४/२०२६ ते
२०/०४/२०२६३०/०४/२०२६०८/०५/२०२६
आरटीई लॉटरी निवड यादी जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १७,७२८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्याखालोखाल ठाणे (१०,५७८) आणि नागपूर (६,९९२) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. मुंबईमध्येही सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली असून तेथे प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवातही झाली आहे.
आरटीई (RTE) २५% प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ ची जिल्हा निहाय अधिकृत आकडेवारी (एकूण रिक्त जागा आणि निवड झालेले विद्यार्थी) दिली आहे.
- पुणे: १८,०६० रिक्त जागा | १७,७२८ निवडलेले विद्यार्थी
- ठाणे: ११,७५४ रिक्त जागा | १०,५७८ निवडलेले विद्यार्थी
- नागपूर: ७,०८१ रिक्त जागा | ६,९९२ निवडलेले विद्यार्थी
- नाशिक: ५,६७३ रिक्त जागा | ५,३२६ निवडलेले विद्यार्थी
- पालघर: ५,६८५ रिक्त जागा | ३,१८३ निवडलेले विद्यार्थी
- मुंबई (सर्व विभाग): ६,०२३ रिक्त जागा | ४,९४१ निवडलेले विद्यार्थी
- छत्रपती संभाजीनगर: ४,९११ रिक्त जागा | ४,८६६ निवडलेले विद्यार्थी
- रायगड: ४,७८४ रिक्त जागा | ४,३४५ निवडलेले विद्यार्थी
- अहिल्यानगर: ३,७६५ रिक्त जागा | ३,६४१ निवडलेले विद्यार्थी
- जळगाव: ३,४२७ रिक्त जागा | ३,३४० निवडलेले विद्यार्थी
- कोल्हापूर: ३,३६१ रिक्त जागा | २,९०० निवडलेले विद्यार्थी
- सोलापूर: २,९४७ रिक्त जागा | २,६७३ निवडलेले विद्यार्थी
- बुलढाणा: २,९३३ रिक्त जागा | २,८०१ निवडलेले विद्यार्थी
- नांदेड: २,८०३ रिक्त जागा | २,७५७ निवडलेले विद्यार्थी
- अमरावती: २,६२६ रिक्त जागा | २,५८६ निवडलेले विद्यार्थी
- जालना: २,६०२ रिक्त जागा | २,२८९ निवडलेले विद्यार्थी
- बीड: २,४२५ रिक्त जागा | २,३६० निवडलेले विद्यार्थी
- लातूर: २,३४३ रिक्त जागा | २,२६९ निवडलेले विद्यार्थी
- यवतमाळ: २,२२२ रिक्त जागा | २,१५९ निवडलेले विद्यार्थी
- सांगली: २,१५२ रिक्त जागा | १,७०९ निवडलेले विद्यार्थी
- सातारा: २,१३४ रिक्त जागा | २,००६ निवडलेले विद्यार्थी
- अकोला: २,०५६ रिक्त जागा | २,०१८ निवडलेले विद्यार्थी
- चंद्रपूर: १,६५१ रिक्त जागा | १,६१२ निवडलेले विद्यार्थी
- परभणी: १,५५४ रिक्त जागा | १,४४४ निवडलेले विद्यार्थी
- वर्धा: १,३९० रिक्त जागा | १,३८० निवडलेले विद्यार्थी
- धुळे: १,३०७ रिक्त जागा | १,२२५ निवडलेले विद्यार्थी
- धाराशिव: १,२८६ रिक्त जागा | १,२२८ निवडलेले विद्यार्थी
- गोंदिया: १,०६९ रिक्त जागा | १,०६७ निवडलेले विद्यार्थी
- वाशिम: १,००७ रिक्त जागा | ९४४ निवडलेले विद्यार्थी
- भंडारा: ९२५ रिक्त जागा | ९१६ निवडलेले विद्यार्थी
- हिंगोली: ८९३ रिक्त जागा | ८५९ निवडलेले विद्यार्थी
- रत्नागिरी: ८०४ रिक्त जागा | ६५५ निवडलेले विद्यार्थी
- गडचिरोली: ५४४ रिक्त जागा | ५१४ निवडलेले विद्यार्थी
- नंदुरबार: ३५८ रिक्त जागा | ३५० निवडलेले विद्यार्थी
- सिंधुदुर्ग: २७१ रिक्त जागा | १५० निवडलेले विद्यार्थी
एकूण महाराष्ट्र: १,१४,८२६ रिक्त जागा | १,०५,८११ निवडलेले विद्यार्थी | प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी (Waiting List): ८६,०३४
जिल्हा निहाय रिक्त जागा

पालकांनो, ‘या’ चुका टाळा; अन्यथा प्रवेश रद्द होईल!
प्रवेश घेताना पालकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर अर्जात भरलेली माहिती आणि तुमच्याकडील मूळ कागदपत्रे यामध्ये तफावत आढळली, तर मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो.
निवासी पुरावा: यंदा निवासी पुराव्यासाठी ‘गॅस बुक’ चालणार नाही. जर तुम्ही बँकेचे पासबुक देणार असाल, तर ते फक्त सरकारी (नॅशनललाईज्ड) बँकेचेच असावे.
पडताळणी समिती: शाळेत जाण्यापूर्वी आपल्या भागातील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची तपासणी करणे अनिवार्य आहे. समितीचा शिक्का आणि स्वाक्षरी मिळाल्यानंतरच शाळेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.
आरटीई पहिल्या निवड यादीतील प्रवेशासाठी महत्वाच्या सूचना वाचा
आरटीई लॉटरी दुसरी निवड यादी जाहीर
ज्या विद्यार्थ्यांचे नाव पहिल्या यादीत आलेले नाही, अशा ८६,०३४ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत (Waiting List) स्थान मिळाले आहे. पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया ८ मेला संपल्यानंतर, शिल्लक राहिलेल्या जागांवर १५ मे २०२६ रोजी आरटीई लॉटरी दुसरी निवड यादी मध्ये या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील पालकांनी नियमितपणे पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासत राहावे.
अधिक माहितीसाठी RTE पोर्टलच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/ या अधिकृत वेबसाईटला भेट देत राहावी.









