महाज्योती मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब; ऑनलाईन नोंदणी सुरू, डायरेक्ट लिंक

Published On: May 31, 2026
Follow Us
MahaJyoti Tab Yojana Registration 2026

MahaJyoti Tab Yojana Registration 2026: महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती- भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch- 2026-28 च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरीता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी सुरू झाली असून, 7 जून 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. संपूर्ण माहिती पाहूया.

mahajyoti tab yojana 2026 last date

MahaJyoti Free Tablet योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता

  1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.
  2. विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा/असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी.
  3. सन-2026 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.
  4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
  5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.

MahaJyoti Free Tablet अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
  2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)
  5. इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका
  6. दिव्यांग असल्यास दाखला
  7. अनाथ असल्यास दाखला

MahaJyoti Tab Yojana Registration 2026 अर्ज कसा करावा

  1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for JEE/NEET/MHT-CET- Batch-2026-28 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
  2. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

आरक्षण

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण खालीलप्रमाणे असणार आहे.

MahaJyoti Tab Yojana Registration 2026

1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.

3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

अटी व शर्ती

  1. Mahajyoti Tab Registration 2026 Last Date अर्ज करण्याची अंतिम दि. 07/06/2026 आहे.
  2. पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
  4. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असणे अनिवार्य आहे.
  5. सदर प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11 वी ला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहिल, जे विद्यार्थी सदरचे कागदपत्रे सादर करणार नाही, अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
  6. कोणत्याही माध्यमातुन व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
  7. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावाः संपर्क क्र- 0712-2870120/21

MahaJyoti Tablet Yojana Registration 2026 महत्वाच्या लिंक

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment