Maharashtra Board SSC Result Link 2025 दहावी निकाल वेबसाईट अधिकृत लिंक जाहीर

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Board SSC Result Link 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अखेर दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक जाहीर केली आहे. www.mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दिनांक 13 मे रोजी दुपारी 1 वाजता SSC Result 2025 ऑनलाइन उपलब्ध झाला आहे. निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत लिंक खाली दिलेल्या आहेत.

निकाल पाहण्यासाठी खाली दिलेली एकच लिंक सुरु आहे.

दहावीचा निकाल जाहीर – संपूर्ण तपशील

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यंदा राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. निकालानुसार यंदा दहावीचा एकूण निकाल ९४.१० टक्के लागला असून, यामध्ये मुलींनी मुलांपेक्षा अधिक चांगले यश मिळवले आहे. तसेच, दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची घौडदौड कायम ठेवली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही कोकण विभागाने सर्वोत्तम कामगिरी करत 98.82% एकूण निकालाची टक्केवारी नोंदवली आहे.

विभागानुसार निकाल टक्केवारी पुढीलप्रमाणे:

  • कोकण: 99.01%
  • कोल्हापूर: 97.45%
  • पुणे: 96.44%
  • मुंबई: 95.83%
  • अमरावती: 95.58%
  • नाशिक: 95.28%
  • लातूर: 95.27%
  • छत्रपती संभाजीनगर: 95.19%
  • नागपूर: 94.73%

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालात मुलींनी मुलांपेक्षा 3.83% नी अधिक चांगली कामगिरी केली आहे. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 96.14% तर मुलांची 92.31% इतकी आहे.

संपूर्ण राज्याचा निकाल:

  • एकूण नोंदणी – १६ लाख १० हजार ९०८
  • परीक्षेला बसले – १५ लाख ९८ हजार ५५३
  • उत्तीर्ण विद्यार्थी – १४ लाख ८७ हजार ३९९
  • निकाल टक्केवारी – ९३.०४%

विशेष बाबी:

  • मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक चांगला आहे.
  • कोकण विभाग राज्यात सर्वाधिक यशस्वी ठरले.
  • फ्रेश (नवीन) विद्यार्थ्यांचा निकाल सर्वाधिक – ९४.१०%
  • सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल – ९३.०४%
SSC Examination February 2025 Result 13 may 2025

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आली होती.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

इ. 10 वी (SSC) निकालानंतरचे महत्त्वाचे अपडेट्स येथे पाहा

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!