Maharashtra Board Result 2025 दहावीचा निकाल जाहीर निकालाचे विभागनिहाय तपशील पाहा

Published On: May 13, 2025
Follow Us
Maharashtra Board Result 2025

Maharashtra Board Result 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता 12 वी निकाल 5 मे 2025 रोजी (MSBSHSE) www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला आहे. आता 10 वीचा (SSC Result) निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यंदा 10 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च, तर 12 वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान झाली होती. निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून 9 अधिकृत लिंक जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच इतर महत्वाचे तपशील जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

Maharashtra Board Result 2025

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीही कोकण विभागाने सर्वाधिक 98.82% निकाल देऊन पहिला क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांसाठी निकाल पाहण्याची लिंक दुपारी 1 वाजता सुरु होईल.

यंदाचा एकूण निकाल 94.10% लागला आहे.

विभागनिहाय निकाल

  • कोकण: 99.01%
  • कोल्हापूर: 97.45%
  • पुणे: 96.44%
  • मुंबई: 95.83%
  • अमरावती: 95.58%
  • नाशिक: 95.28%
  • लातूर: 95.27%
  • छत्रपती संभाजीनगर: 95.19%
  • नागपूर: 94.73%

यावर्षी मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुलींची पास होण्याची टक्केवारी 96.14% असून मुलांची टक्केवारी 92.31% आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.83% अधिक आहे.

आता दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता दहावीचा SSC Result 2025 विद्यार्थ्याना ऑनलाईन पाहता येणार आहे.

यंदा परीक्षा वेळेआधी घेतल्यामुळे तपासणीचे काम परीक्षा सुरू असतानाच सुरू झाले. क्रीडा गुणांची नोंद 21 एप्रिलपर्यंत घेण्यात आली असून, प्रात्यक्षिक व सवलतीचे गुणदेखील वेळेवर जमा झाले आहेत. यावर्षीही प्रात्यक्षिक गुण ऑनलाइन पद्धतीने संकलित करण्यात आले आहेत. तर आता 10 वीचा अंतिम निकाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

Important Announcement for Students!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
(Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education)

  • इयत्ता 10वी (SSC) निकाल 2025
  • 13 मे 2025 रोजी
  • दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन प्रसिद्ध होणार आहे.

निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून 9 अधिकृत लिंक जाहीर

SSC Examination February 2025 Result 13 may 2025

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Class X 2025 results will be available on 13th May 2025 at 1:00 PM.

Best of luck to all students!

अधिकृत लिंक https://sscresult.mahahsscboard.in/

दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून 9 अधिकृत लिंक जाहीर, येथे पाहा

निकाल Digilocker मध्ये उपलब्ध

दहावी-बारावीच्या सुमारे ३१ लाख विद्यार्थ्यांपैकी २१ लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी मंडळाकडे प्राप्त झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा निकाल डिजीलॉकर अॅपमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे, तर अन्य विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

इ. 10 वी (SSC) निकालानंतरचे महत्त्वाचे अपडेट्स

१) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत व पुनर्मूल्यांकन

  • जर विद्यार्थ्यांना वाटत असेल की त्यांच्या काही विषयांमध्ये योग्य गुण मिळाले नाहीत, तर त्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतो.
  • हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत – mahahsscboard.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून.
  • अर्ज विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा शाळेमार्फत भरायचा आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १४ मे २०२५ ते २८ मे २०२५.
  • शुल्क भरताना Debit Card / Credit Card / UPI / Net Banking चा वापर करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अटी व सूचना संकेतस्थळावर वाचणे आवश्यक आहे.

२) पुनर्मूल्यांकनासाठी आधी छायाप्रत घेणे अनिवार्य

  • जर विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल, तर त्यासाठी आधी त्या विषयाच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
  • छायाप्रत मिळाल्यावर पुढील पाच कामकाजाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाचा अर्ज भरावा लागेल.
  • अर्ज Online पद्धतीने विहित नमुन्यात व विहित शुल्कासह भरायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

३) श्रेणी / गुण सुधार योजना (Class Improvement Scheme)

  • जे विद्यार्थी सर्व विषयांसह उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी हवे असल्यास गुण/श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देऊ शकतात.
  • योजनेअंतर्गत ३ संधी मिळणार आहेत:
    1. जून-जुलै २०२५
    2. फेब्रुवारी-मार्च २०२६
    3. जून-जुलै २०२६

४) पुरवणी परीक्षा अर्ज – जून-जुलै २०२५ साठी

  • जे विद्यार्थी नापास झालेत, किंवा श्रेणी सुधार करू इच्छितात, किंवा खाजगीरित्या परीक्षा देणार आहेत, त्यांनी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरावा लागेल.
  • अर्जाची प्रक्रिया १५ मे २०२५ पासून सुरू होईल.
  • हे अर्ज देखील मंडळाच्या mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • यासंदर्भात एक स्वतंत्र परिपत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

अधिक माहितीसाठी https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

दहावीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार

Maharashtra Board Result 2025 आता दहावीचा निकाल हा दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना आपला निकाल mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी आता https://mahafyjcadmissions.in/ ही नवीन अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली असून, शैक्षणिक वर्ष 2025 -26 इयत्ता अकरावी साठी शाळा/ उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दि. 15 मे 2025 पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

तर पालक व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सोमवार , दि. 19 मे 2025 पासून सुरू होणार आहे. म्हणजेच आता 15 मेच्या आधी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत वेबसाइट्सवर म्हणजेच mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर आपली तात्पुरती (Provisional) मार्कशीट उपलब्ध झाली आहे.

पास होण्यासाठी किती गुण लागतात?

महाराष्ट्र 10वी आणि 12वी दोन्ही वर्गांमध्ये पास होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35% गुण मिळणे आवश्यक आहे.
प्रत्येक विषय 100 गुणांचा असतो – यामध्ये 80 गुणांचे थिअरी पेपर आणि 20 गुणांचा प्रॅक्टिकल/आंतरशालेय मूल्यांकन असतो. त्यामध्ये थिअरी पेपरमध्ये किमान 28 गुण आणि प्रॅक्टिकलमध्ये वेगळं पास होणं गरजेचं असतं.

महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वी निकाल 2025 कसा पहाल?

स्टेप 2: मुख्यपृष्ठावर खालीलपैकी योग्य लिंकवर क्लिक करा:

  • “SSC Examination Result 2025” (10वीसाठी)
  • “HSC Examination Result 2025” (12वीसाठी)

स्टेप 3: तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव (हॉलतिकीटवर दिलेले) भरा.

स्टेप 4: “View Result” किंवा “निकाल पहा” या बटनावर क्लिक करा.

पायरी 5: तुमची तात्पुरती (Provisional) मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 6: मार्कशीट डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा.
(टीप: मूळ मार्कशीट काही दिवसांनी शाळेमार्फत मिळेल.)

निकालानंतर गुणपडताळणीची संधी!

निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली स्कोअरकार्ड (मार्कशीट) तपासावी. मूळ मार्कशीट काही दिवसांनी शाळेतून मिळेल. जर निकालामध्ये काही अडचण वाटली किंवा समाधानकारक वाटला नाही, तर विद्यार्थी जून 2025 मध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात.

जर एखादा विद्यार्थी नापास झाला असेल, तर तो जुलै 2025 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेला बसू शकतो. विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत वेबसाइट्सवर विश्वास ठेवावा व अफवांपासून सावध राहावं. निकालानंतर आपल्या पुढील अभ्यासाची किंवा करिअरची तयारी सुरू करावी.

अधिक माहितीसाठी राज्य शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

RTE Admission Documents List 2026

आरटीई फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? पालकांनो ही यादी आताच तपासा!

January 13, 2026
Maharashtra Board Time Table 2026 Download

10 वी , 12 वी बोर्ड परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध, या तारखेपासून प्रॅक्टिकल आणि लेखी परीक्षा; अधिकृत वेळापत्रक पाहा

January 12, 2026
12th Board Exam Hall Ticket Released

12 वीचे हॉल तिकीट जाहीर! नावात चूक झाली किंवा हॉल तिकीट हरवल्यास ‘हा’ आहे सोपा उपाय

January 12, 2026
hsc hall ticket 2026 release date

प्रतीक्षा संपली! १२ वीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ‘या’ तारखेपासून मिळणार; बोर्डाची मोठी अपडेट

January 12, 2026
Maharashtra Scholarship Exam 2026 27

महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा ‘बदल’! नवीन ‘अधिसूचना’ जाहीर; पहा विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्ती’ची ‘रक्कम किती’ मिळणार? संपूर्ण माहिती

January 11, 2026
RTE Admission Process Information 2025 26

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे – ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती RTE Admission Process Information 2026 27

January 11, 2026

Leave a Comment