LLB 3 Year CET Result Update राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई CET Cell कक्षाकडून LLB 3 आणि 5 वर्षांसाठी CET परीक्षा घेण्यात आली आता या परीक्षेच्या निकाला संदर्भात Normalisationपद्धत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे Normalisation-Document_LLB-3-Yrs-CET-2025 आणि 5 Yrs साठी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.
LLB 3 Year CET Result Update
LLB 3 वर्षांसाठी CET परीक्षा CET CELL मार्फत घेतली जाते आणि ही परीक्षा वेगवेगळ्या दिवसांमध्ये व शिफ्ट्समध्ये घेतली गेली होती. त्यामुळे प्रत्येक शिफ्टमध्ये वेगवेगळी प्रश्नपत्रिका देण्यात आली. या सर्व प्रश्नपत्रिका समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरीही त्यांच्या कठीणतेच्या पातळीत थोडाफार फरक असू शकतो.
यावर उपाय म्हणजे – Normalisation (साम्यीकरण) पद्धत
Normalisation म्हणजे काय?
ही एक गणितीय पद्धत आहे जी वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये झालेल्या पेपर्सचे गुण तुलनात्मक पद्धतीने मोजण्यासाठी वापरली जाते. यामध्ये परीक्षार्थ्याला मिळालेला गुण 100 ते 0 या श्रेणीत Percentile (प्रतिशतांक) मध्ये रूपांतरित केला जातो.
Percentile म्हणजे काय?
Percentile हा त्या परीक्षार्थ्याच्या गुणांच्या आधारे त्याच्याइतके किंवा त्याहून कमी गुण मिळवणाऱ्यांचे टक्केवारीतले प्रमाण दाखवतो. म्हणजे एखाद्याचा Percentile 90 आहे, याचा अर्थ त्याच्याइतके किंवा त्याहून कमी गुण 90% विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.
कशी मोजली जाते Percentile?
Percentile Score = (तुमच्याइतके किंवा कमी गुण मिळवलेले विद्यार्थ्यांचे एकूण संख्येचे प्रमाण / एकूण उपस्थित विद्यार्थी) x 100
ही गणना 7 दशांश स्थानी केली जाते म्हणजेच अधिक अचूकता मिळते आणि गुण समस्यानिवारण (tie-breaking) सुलभ होते.
उदाहरण –
एकूण 4 शिफ्ट्समध्ये परीक्षा घेतली गेली. प्रत्येक शिफ्टमधील टॉप स्कोअर करणाऱ्यांना 100 Percentile मिळाला. उदा:
शिफ्ट | उपस्थित उमेदवार | सर्वाधिक गुण | Percentile |
---|---|---|---|
D1 B1 | 2249 | 144 | 100.0000000 |
D1 B2 | 2272 | 147 | 100.0000000 |
D2 B1 | 2216 | 149 | 100.0000000 |
D2 B2 | 2257 | 141 | 100.0000000 |
अंतिम निकाल कसा तयार होतो?
सर्व चारही सत्रांतील उमेदवारांचे Percentile वेगवेगळे काढले जातात आणि नंतर एकत्र करून CET Score तयार केला जातो. यात कुठल्याही शिफ्टमधील परीक्षार्थ्याला फायदा किंवा नुकसान होऊ नये याची दक्षता घेतली जाते.
महत्त्वाच्या गोष्टी –
- Percentile हा गुणांचा सरासरी (average) नसतो.
- Percentile आणि Percentage यात फरक आहे.
- सर्वाधिक गुण मिळवलेल्यांना 100 Percentile मिळतो.
- ही पद्धत JEE, NEET सारख्या मोठ्या परीक्षा संस्थांमध्येही वापरली जाते.
📣 एकंदरीत निष्कर्ष:
LLB CET 3 वर्ष 2025 ची परीक्षा वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये घेतल्यामुळे, परीक्षार्थ्यांवर शिफ्टच्या कठीणतेचा परिणाम होऊ नये यासाठी “Normalization” ही पद्धत वापरली जाते. त्यामुळे तुमचा निकाल इतर शिफ्ट्सशी समतोल राखत योग्य प्रकारे मोजला जातो.
अधिक माहितीसाठी
- Normalisation-Document_LLB-3-Yrs-CET-2025 येथे डाउनलोड करा
- Normalisation-Document_LLB-5-Yrs-CET-2025 येथे डाउनलोड करा
