Maharashtra 11th Admission Process अकरावी प्रवेशासाठी नवीन वेबसाईट सुरू, नोंदणी करण्याचे वेळापत्रक जाहीर संपूर्ण माहिती

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra 11th Admission Process राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेत मोठा बदल करत, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 11 वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता mahafyjcadmissions.in ही नवीन अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra 11th Admission Process

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी स्पष्ट केले की, मार्च 2025 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अकरावीचा प्रवेश केवळ ऑनलाईन प्रणालीद्वारेच होणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी नवीन वेबसाईट सुरू

शाळा उच्च माध्यमिक विद्यालयांना 15 मे 2025 पर्यंत नोंदणी करता येणार

अकरावी प्रवेशासाठी आता https://mahafyjcadmissions.in/ ही नवीन अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली असून, शैक्षणिक वर्ष 2025 -26 इयत्ता अकरावी साठी शाळा/ उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दि. 15 मे 2025 पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी नोंदणी दि. 19 मे 2025 पासून सुरू

तर पालक व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया https://mahafyjcadmissions.in/ या अधिकृत वेबसाईटवर सोमवार , दि. 19 मे 2025 पासून सुरू झाली आहे.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षण निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत की, मार्च २०२५ मध्ये १० वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करावे.

प्रवेश नियंत्रण कक्ष आणि हेल्प सेंटरची स्थापना

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात स्वतंत्र प्रवेश नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे विद्यार्थ्यांना व पालकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जात आहे. ऑनलाईन मदतीसाठी हेल्प सेंटरची सुविधाही लवकरच सुरू होणार आहे.

शिक्षक व लिपिकांसाठी विशेष प्रशिक्षण

संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी विभागातील सर्व मुख्याध्यापक आणि लिपिक यांचे तालुका/वार्ड स्तरावर प्रशिक्षण घेतले जाणार आहे.

प्रवेश संकेतस्थळ लवकरच सुरू होणार

11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी नवीन संकेतस्थळ सुरू केले जाणार असून, त्यावर विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, सूचना आणि मार्गदर्शन सविस्तर दिले जाईल. प्रवेश अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

शाळांना सूचना – माहिती न भरल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो!

राज्य मंडळाच्या अंतर्गत असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपली प्रवेशासाठी आवश्यक माहिती https://forms.gle/E2K5a5wwssuwQ9Pt6 या लिंकवर भरावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

२०२४-२५ मध्ये माहिती भरली असली तरीही नवीन वर्षासाठी पुन्हा भरावी लागणार आहे. जी शाळा/महाविद्यालये ही माहिती वेळेत भरणार नाहीत, त्यांना इयत्ता ११ वीचे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अलॉट केले जाणार नाहीत.

MAHA FYJC Admission Website : https://mahafyjcadmissions.in/

इयत्ता अकरावीची जादा तुकड्या, अतिरिक्त शाखा मंजुरी प्रक्रिया आता ऑनलाईन होणार

Maharashtra 11th Admission Process दरवर्षी इयत्ता 11 वीच्या जादा तुकड्या किंवा शाखा सुरू करण्यासाठी राज्यातील अनेक शैक्षणिक संस्था प्रस्ताव पाठवतात. हे प्रस्ताव शिक्षणाधिकारी, विभागीय उपसंचालक, संचालक आणि शासनस्तरावर जाऊन मंजूर होतात. मात्र, प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यास तीच प्रक्रिया पुन्हा करावी लागते, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात.

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने एक नवीन संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते या प्रणालीचा शुभारंभ झाला. या प्रणालीच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था आता कोणत्याही कार्यालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. अर्जासोबत लागणारी कागदपत्रेही थेट प्रणालीवर अपलोड करता येतात.

ही प्रणाली स्वयंचलित निकषांवर आधारित असून, अर्ज तपासणीपासून मंजुरीपर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल आहे. यामुळे मानवी चुका कमी होतील, अर्ज मंजुरीस लागणारा वेळ वाचेल आणि अधिक पारदर्शक निर्णय प्रक्रिया शक्य होईल.

याशिवाय, स्टुडेंट पोर्टलवरून आवश्यक डेटा स्वयंचलितपणे मिळणार असल्याने पुन्हा माहिती भरण्याची गरज नाही. अर्जाची स्थिती संस्थेला डॅशबोर्डद्वारे सतत पाहता येणार असून, मंजुरी किंवा नामंजुरीचे कारणही ऑनलाईन कळणार आहे.

ही प्रणाली संस्थांसाठी जलद, पारदर्शक, सुलभ आणि वेळ वाचवणारी आहे. त्यामुळे इयत्ता 11 वीच्या शाखा वाढीच्या प्रक्रियेत आता एक नवे परिवर्तन घडणार आहे.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!