Ladki Bahin Yojana May Installment Date महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. योजनेच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी आणि केवळ गरजू व पात्र महिलांपर्यंतच लाभ पोहोचावा यासाठी शासनाने अर्जदारांची पुन्हा एकदा कसून पडताळणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये अपात्र ठरणारे अर्ज रद्द केले जाणार आहेत. एकीकडे ही पडताळणी सुरू असतानाच, लाभार्थी महिला मे महिन्याचा (11 वा) हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच शासनाने मे महिन्याच्या हप्त्यासाठी 335.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
दिनांक 6 जून पासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण अपडेट
Ladki Bahin Yojana नवीन अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबद्दल एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतही ती काटेकोरपणे पाळली जात आहे.
काय आहे प्रकरण?
या योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी २ लाखांहून अधिक अर्जांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात एक गोष्ट निदर्शनास आली की, यापैकी सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे ही बाब लक्षात येताच अशा व्यक्तींना कोणताही लाभ दिला गेलेला नाही.
उद्देश काय आहे?
मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ फक्त आणि फक्त योग्य लाभार्थ्यांनाच मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. म्हणूनच, अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू राहणार आहे. यामुळे गरजूंनाच या योजनेचा फायदा मिळेल याची खात्री केली जात आहे.
काय आहे नवीन निर्णय?
महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेच्या नावाखाली अनेक फसवणुकीच्या घटना समोर आल्यानंतर सरकारने अर्जदारांची पुन्हा पडताळणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे काही महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर काही महिलांसाठी ही पडताळणी चिंतेचा विषय बनली आहे.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. यातील अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या तसेच काही महिला अपात्र असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. ही फसवणूक रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने आता सर्व अर्जांची पुन्हा एकदा कसून तपासणी (पडताळणी) करण्याचे आदेश दिले आहेत. या तपासणीत जे अर्ज योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत, ते रद्द केले जाणार आहेत.
‘या’ महिलांना मोठा दिलासा – अर्ज तपासले जाणार नाहीत!
या पडताळणी प्रक्रियेतून काही महिलांना वगळण्यात आलं आहे, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिलांकडे पिवळे (अंत्योदय) किंवा केशरी (बीपीएल) रेशन कार्ड आहे, त्यांचे अर्ज पुन्हा तपासले जाणार नाहीत.
यामागचं कारण असं की, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड हे अन्न धान्य पुरवठा विभागाने जारी केले आहेत आणि ते कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिले जातात. या कार्डधारकांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असतं, हे आधीच पडताळलेलं असतं. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेच्या उत्पन्नाच्या निकषांनुसार त्या पात्र आहेत. त्यांची पात्रता आधीच सिद्ध असल्याने त्यांचे अर्ज पुन्हा तपासण्याची गरज नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. यामुळे या महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता नाही आणि त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील.
पण इतरांवर पडताळणीची टांगती तलवार…
ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाही आणि ज्यांनी योजनेत अर्ज केला आहे, त्यांचे अर्ज मात्र यापुढे तपासले जातील. यामध्ये ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन, नियमबाह्य पद्धतीने किंवा फसवणूक करून योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे अर्ज रद्द केले जातील आणि त्यांना मिळणारा हप्ता थांबवला जाईल. फसवणुकीने उघडलेल्या खात्यांमध्ये गेलेले पैसेही यामुळे रोखले जातील.
Ladki Bahin Yojana May Installment Date मे महिन्याचा 11 वा हप्ता ‘या’ आठवड्यात येणार?
Ladki Bahin Yojana May Installment Date हप्ता कधी येऊ शकतो?
आतापर्यंत या योजनेचे १० हप्ते यशस्वीरित्या जमा झाले आहेत. राज्य सरकार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात (डीबीटीद्वारे) देत असते. एप्रिल महिन्याचा १०वा हप्ता जमा झाला आहे. आता महिलांना ११ वा हप्ता मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाने 335.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 23 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
एकीकडे पडताळणीची प्रक्रिया सुरू असतानाच, योजनेच्या लाभार्थी महिला मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. एप्रिलचा हप्ता मिळाल्यानंतर आता मे महिन्याचे १५०० रुपये कधी येणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मे महिन्याचा हप्ता 6 जून पासून वितरित करण्यात येत आहे. पण हप्ता जमा होण्याआधीच पडताळणी सुरू झाल्याने, ज्या महिलांचे अर्ज या पडताळणीत अपात्र ठरतील, त्यांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्याचे कारण म्हणजे दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार निकषात बसणाऱ्या पात्र लाभयार्थ्याना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येतो. सुधारित निकष पाहा