Ladki Bahin Yojana Jun Installment 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून 2026 महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 8 जुलै 2026 रोजी शासन निर्णय जारी करून आर्थिक लाभ देण्यासाठी 309.54 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी महिला व बाल विकास विभागामार्फत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वितरित करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या जून 2026 महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पात्र महिला लाभार्थींना आर्थिक लाभ देण्यासाठी 309.54 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वितरित करण्यात येणार असून, त्यामार्फत पात्र महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे.
तसेच सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी संबंधित लेखाशिर्षाखाली 3,000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून केवळ पात्र महिलांनाच लाभ दिला जाईल.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! 80 लाख महिला अपात्र? सरकारचा मोठा खुलासा
वितरित निधीचा वापर करताना वित्तीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, खर्चाचा अहवाल, निधी उपयुक्तता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक माहिती नियमितपणे शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, हा शासन निर्णय केवळ निधी मंजुरी संदर्भातील असल्याने सर्व लाभार्थींच्या खात्यात त्याच दिवशी पैसे जमा होतील, असे नाही. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात होईल.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय डाउनलोड करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता ‘या’ महिलांनाच मिळणार








