लाडकी बहीण योजना: मे महिन्याचा हप्ता मंजूर, पैसे खात्यात कधी येणार?

Published On: June 12, 2026
Follow Us
Ladki Bahin Yojana May Installment Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पात्र लाडक्या महिलांसाठी राज्य शासनाने मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून , यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय १० जून २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. प्रत्यक्ष हप्ता खात्यात कधी जमा होणार? याबाबतची सविस्तर अपडेट पाहूया.

मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर

लाडकी बहिण योजनेचा हप्ता वितरित करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी अदा करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाला हा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एकूण ३००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी माहे मे २०२६ च्या लाभासाठी ३४४.७४ कोटी रुपये प्रशासकीय पातळीवर वितरित करण्यात आले आहेत.

या महिलांनाच मिळणार मे महिन्याचा हप्ता

या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने कठोर निर्देश दिले आहेत. सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची योग्य ती छाननी करून केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल, याची संपूर्ण जबाबदारी महिला व बाल विकास विभागावर निश्चित करण्यात आली आहे.

त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसून त्यांच्या खात्यात मे महिन्याचा कोणताही हप्ता जमा होणार नाही.

मे महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होणार?

गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार, याकडे राजभरातील लाडक्या बहिणी वाट पाहत आहे. मात्र, आता सदर निधी अधिकृतरीत्या मंजूर झाल्याने यापूर्वीचा दरमहा विचार करता शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर साधारण 5 ते 6 दिवसात पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जातो. त्यानुसार साधारणपणे 15 जून पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होईल अशी अपेक्षा आहे.

लाडकी बहीण योजना (GR)मे महिन्याचा हप्ता मंजुरीचा शासन निर्णय डाउनलोड करा
अधिक माहितीसाठीअधिकृत वेबसाईट

महिला योजना

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment