Ladki Bahin Yojana Fund Release 2026: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि सकारात्मक अपडेट समोर आली आहे. राज्य शासनाने सन २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षासाठी या योजनेला गती देण्याच्या उद्देशाने भरीव निधीची तरतूद केली असून, प्रत्यक्ष निधी वितरणास सुरुवात झाली आहे. यामुळे महिलांना आता लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल २०२६ या दोन महिन्यांसाठी एकूण ७३०.५१ कोटी रुपये इतका मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २० मे २०२६ रोजी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार, महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांना प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर हा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
हा निधी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि महिलांच्या खात्यात वेळेवर पैसे पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी : लाडकी बहीण योजना निधी बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा
तसेच ई-केवायसी न केलेल्या महिलांना कागदपत्रे सादर करण्याचे कोणतेही निर्देश महिला व बालविकास विभागाने दिलेले नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत e KYC करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
सदर वस्तुस्थिती लक्षात घेता, अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/







