९ जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार नाहीत; शिक्षण संचालकांचे स्पष्ट निर्देश

Published On: July 8, 2026
Follow Us
school-closed-maharashtra-9-july-2026-salary-cut-warning

दिनांक ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.

तसेच आंदोलनाच्या दिवशी शाळा बंद ठेवल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर एका दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे वृत्त समोर आले होते.

या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच बृहन्मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना आवश्यक सूचना जारी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शाळा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश देण्यात आले असून ९ जुलै रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांचे अध्यापन नियमित सुरू ठेवावे, असे आवाहन शिक्षण संचालकांनी केले आहे.

school close 9 july circuler

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment