Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – सुधारित निकष – सविस्तर जाणून घ्या

By MarathiAlert Team

Updated on:

Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या योजनेचे सुधारित निकष जाहीर करण्यात आले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचे सुधारित निकष पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ Majhi Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र शासनाने महिला सशक्तीकरण आणि आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक सहाय्य दिले जाते. ही मदत DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल हप्त्याबाबत मोठी अपडेट! ‘या’ महिलांना मिळणार नाही पैसे Ladki Bahin Yojana April Installment Date

योजनेसाठी आवश्यक पात्रता Ladki Bahin Yojana Eligibility Criteria

  1. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला,
  3. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत,
  4. Majhi Ladki Bahin या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख (२.५ lakh) रुपयांपेक्षा जास्त नसावे.

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. योजनेच्या लाभासाठी (Nari Shakti) ऑनलाइन अर्ज आवश्यक आहे.
  2. लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक
  3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.)
  4. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  5. सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य आहे.) मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे.
  6. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही.
  7. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  8. Majhi Ladki Bahin Yojana योजनेच्या अटी- शर्तीचे पालन करण्याबाबतचे लाभार्थ्याचे स्वाक्षरीसह हमीपत्र आवश्यक आहे.

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची अपात्रता

  1. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
  2. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
  3. अडीच लाख रुपये उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  4. लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतला असेल,
  5. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा स्टेटस कसा पाहाल? ऑनलाईन नाही, तर ऑफलाईन सोप्पा मार्ग!

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ Nari shakti Doot App

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पहा

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!