Ladki Bahin Yojana April Installment Date: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेत असलेल्या महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. एप्रिल महिन्याचा हप्ता (April Installment) अक्षय तृतीया सणाच्या दिवशी जमा होणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. काय आहे सत्यता जाणून घ्या.
Table of Contents
लाडकी बहीण योजना: या महिलांना मिळतो लाभ!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुधारित नियमानुसार आता खालील निकष पूर्ण करणाऱ्या पात्र लाभार्थी महिलांना Ladki Bahin योजनेचा लाभ मिळणार आहे.
- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
- राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
या महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता?
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत. ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत, त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही. यामध्ये खालील महिला समाविष्ट आहेत.
- इतर सरकारी योजना लाभार्थी: दरमहा ₹1500 किंवा त्याहून अधिक लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
- संजय गांधी निराधार योजना लाभार्थी: संजय गांधी योजनेच्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात आले आहे. आतापर्यंत या योजनेतील 2.30 लाख महिलांना अपात्र घोषित केले आहे.
- चारचाकी वाहन: ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणाकडे चारचाकी वाहन असल्यास अशा महिलांना देखील यापुढे लाभ मिळणार नाही.
- नमोशक्ती योजना लाभार्थी: 1.60 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले.
- 65 वर्षांवरील महिला: 1.10 लाख महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवले आहे.
- आंतरराज्य विवाह, आधार-बँक खाते विसंगती: ज्या महिलांचे आधार कार्ड व बँक खात्यातील नाव वेगळे आहे किंवा दोन अर्ज केले आहेत, त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला थेट खात्यात जमा होणार? | Ladki Bahin Yojana April Installment Date
महाराष्ट्र राज्य सरकारने (जून 2024) मध्ये Ladki Bahin Yojana सुरू केली आहे. महिला दिनांच्या निमित्ताने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात 8 मार्च रोजी जमा करण्यात आले आहे. आता पात्र महिलांना पुढील Ladki Bahin Yojana April Installment Date कधी जमा होणार? याबाबत उत्सुकता लागली आहे.
Ladki Bahin Yojana April Installment Date New Update
सध्या एप्रिल महिना सुरू झाल्यापासून या महिन्याचे पैसे कधी मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू असून, सोशल मिडियावर वेगवेगळ्या संभाव्य तारखा समोर येत आहे. मात्र अद्याप एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
1 एप्रिल पासून आता नवीन आर्थिक वर्ष 2025-26 सुरू झाले आहे. या वर्षासाठी 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केले आहे.
या योजनेतील उत्पन्न, अर्ज पडताळणी सुरू असून, एप्रिलचा हप्ता साधारणपणे एप्रिलच्या अखेरीस म्हणजेच 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया हा सण आहे. या सणाच्या दिवशी लाडक्या बहीणींना एप्रिल चा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र यासाठी सरकार कडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘रूपे कार्ड’ ची सुविधा
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत ‘रूपे कार्ड’ सुरू केले आहे. या कार्डद्वारे महिलांना डिजिटल पेमेंट, विमा संरक्षण आणि QR कोड पेमेंटसह विविध सुविधा मिळतील. हे कार्ड छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह सादर करण्यात आले आहे. महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे, जे महिलांसाठी विशेष कार्ड जारी करत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत अपडेट्ससाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ‘सुधारित’ शासन निर्णय सविस्तर संपूर्ण माहिती
लाडकी बहीण योजनेच्या 15 हजारहून अधिक महिला पात्र – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण