लाडकी बहीण योजनेच्या उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे या तारखेपर्यंत जमा होणार Ladki Bahin Yojana April installment

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana April installment महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी महिलांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये 2 मे 2025 पासून जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात आता एप्रिल महिन्याचा हप्ता हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून, संपूर्ण प्रक्रिया 6 मे 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे.

कोणत्या महिलांना मिळतो ₹1500 हप्ता?

२८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी घोषित झालेल्या शासन निर्णयानुसार, खालील दोन प्रकारच्या महिलांना योजनेचा लाभ दिला जातो:

उदाहरणार्थ, नमो शेतकरी सन्मान योजनेतून दरमहा ₹1000 घेणाऱ्या 7.74 लाख महिलांना ₹500 सन्मान निधी दिला जातो.

Ladki Bahin Yojana April installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाच्या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये (Aadhaar Linked Bank Accounts) मध्ये प्रत्यक्ष जमा करण्याची प्रक्रिया 2 मे 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यातील पात्र लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी संख्या जास्त असल्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांत म्हणजेच दिनांक 6 मे पर्यंत एप्रिल महिना लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.

कोण आहेत अपात्र महिला?

महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, खालील गटातील महिला योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत:

  • इतर योजनांतून दरमहा ₹1500 किंवा अधिक रकमेचा लाभ घेणाऱ्या महिला.
  • संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी: 2.3 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले.
  • नमोशक्ती, चारचाकी गाडीधारक, स्वयंमर्जन करणाऱ्या महिला: 1.6 लाख अपात्र.
  • 65 वर्षांवरील महिला: 1.1 लाख लाभार्थ्यांना योजनेतून वगळले.
  • दुहेरी अर्ज, आधार नाव व बँक नावातील विसंगती, आंतरराज्य विवाह लाभार्थी यांनाही लाभ नाकारण्यात आला.

लाडकी बहीण योजना कर्ज योजना – महिला उद्योजिकांसाठी सुवर्णसंधी

राज्य शासनाच्या पुढाकाराने लाडकी बहिणींसाठी आता ₹25,000 पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. महिला लघुउद्योग, सेवा क्षेत्र, गृहउद्योग यांसाठी हे कर्ज बँकांमार्फत वितरित केले जाणार आहे. त्यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक प्रभावीपणे होईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक योजना ठरली आहे. शासनाच्या प्रयत्नांमुळे एप्रिल महिन्याचा हप्ता यशस्वीरित्या पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहे.

लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले का?

1. बँक खात्याचे SMS अलर्ट तपासा:

  • योजना अंतर्गत पैसे जमा झाल्यास, बँकेकडून तुम्हाला SMS येतो.
  • मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

2. बँकेच्या मोबाईल अ‍ॅप किंवा नेट बँकिंगद्वारे तपासा:

  • संबंधित बँकेचे मोबाईल अ‍ॅप (जसे SBI YONO, Maha Mobile, etc.) वापरून बॅलन्स व ट्रान्झॅक्शन तपासा.
  • नेट बँकिंगवर लॉगिन करून ‘Account Statement’ मध्ये पैसे जमा झाले आहेत का हे पाहा.

3. अधिकृत वेबसाइटला भेट द्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर जा.
➡ अर्जदार लॉगिन पर्याय निवडा आणि आवश्यक माहिती भरून लॉगिन करा.
➡ आता तुमच्या अर्जाचे स्टेट्स चेक करा.

किंवा

  1. “लाभार्थी यादी पाहा” किंवा “अर्जाची स्थिती” पर्यायावर क्लिक करा.
  2. आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा अर्ज क्रमांक टाकून माहिती शोधा.

4. बँकेत जाऊन किंवा ATM वरून तपासा

  • जवळच्या ATM वर जाऊन कार्ड टाकून ‘Mini Statement’ पर्याय वापरा.
  • बँकेच्या शाखेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती मिळवा.

अधिक माहितीसाठी : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!