गुड न्यूज! लाडकी बहीण योजनेसाठी ₹2,511 कोटी रुपयाचा निधी मंजूर, शासन आदेश पाहा Ladki Bahin Yojana Funds Approved

Published On: May 1, 2025
Follow Us
Ladki Bahin Yojana Funds Approved

Ladki Bahin Yojana Funds Approved महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण‘ या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट नुसार सन 2025 26 साठी ₹2,511 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता Ladki Bahin Yojana 10th Installment Date लवकरच जाहीर होणार असून, एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात जमा होणार आहे.

Ladki Bahin Yojana Funds Approved संपूर्ण माहिती

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सदर योजनेंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer) दरमहा रु.1,500 इतकी रक्कम देण्यात येते.

सन 2025 26 या आर्थिक वर्षात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी ₹2,829 कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतूदीमधून ₹2,511 कोटी (अक्षरी रु. दोन हजार पाचशे अकरा कोटी फक्त) इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी शासन निर्णय येथे डाउनलोड करा

लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला थेट खात्यात जमा होणार?

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment