Ladki Bahin Yojana Installment उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिली आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या ७ लाख ७४ हजार १४८ महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात येत आहे. काय आहे नवीन अपडेट सविस्तर वाचा
Table of Contents
लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित | Ladki Bahin Yojana Installment
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.
त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७ लाख ७४ हजार १४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.
एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली असून, विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे.
तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे. असे त्यांनी ट्वीट करत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी… pic.twitter.com/485UFXrRiq
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) April 15, 2025
लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता कधी येणार
मुख्यमंत्री माझी Ladki Bahin Yojana Installment April महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत सध्या पात्र लाडक्या बहिणी वाट पाहत असून, याबाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता कधी येणार याबाबत अधिक अपडेट येथे वाचा..