जनगणना 2027: अधिसूचनेतील ‘हे’ 33 प्रश्न विचारले जाणार, वाचा संपूर्ण यादी

Published On: January 26, 2026
Follow Us
Janganana Questions List pdf download 2027

Janganana Questions List 2027: भारताच्या लोकसंख्येच्या मोजणीची, म्हणजेच जनगणनेची (Census) अधिकृत घोषणा झाली असून, गृहमंत्रालयाने नुकतेच यासंबंधीचे राजपत्र (Gazette Notification) प्रसिद्ध केले आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या महामोहिमेसाठी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी, म्हणजेच ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ साठी 33 प्रश्नांची यादी जाहीर केली आहे. याबद्दल सविस्तर पाहूया.

जनगणना 2027: राजपत्र अधिसूचना – ठळक मुद्दे (Key Highlights)

विषय (Subject)तपशील (Details)
अधिसूचना जारी करणारा विभागगृह मंत्रालय, भारत सरकार (भारत के महारजिस्ट्रार का कार्यालय)
राजपत्र प्रसिद्धी दिनांक२२ जानेवारी, २०२६
अधिसूचना क्रमांकका.आ. ३५३(अ) / S.O. 353(E)
जनगणनेचे नाव/वर्षजनगणना २०२७ (Census of India 2027)
जनगणनेचा टप्पाघरयादी आणि गृहगणना (Houselisting & Housing Census)
कायदेशीर आधार (Act)जनगणना अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३७) – कलम ८, पोटकलम (१)
मागील आदेशाची स्थिती७ जानेवारी २०२० रोजीची जुनी अधिसूचना रद्द (अधिक्रांत) करून ही नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
मुख्य उद्देशस्थानिक क्षेत्राच्या सीमांच्या भीतर मकान सूचीकरण (House Listing) आणि मकानांची गणना करणे.
एकूण प्रश्न संख्या३३ (यामध्ये घराची स्थिती, सोयीसुविधा आणि कौटुंबिक माहितीचा समावेश आहे)

जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात घरयादी आणि गृहगणना होणार

देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘जनगणना २०२७‘ चा बिगुल वाजला आहे. यावर्षीच्या यादीत तुमच्या घराच्या बांधकामापासून ते तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट सुविधेपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

जनगणनेचा हा पहिला टप्पा १ एप्रिल पासून सुरू होणार

जनगणनेचा हा पहिला टप्पा १ एप्रिल पासून सुरू होणार असून ३० सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. या कालावधीत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला प्रशासकीय सोयीनुसार ३० दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यामध्ये प्रामुख्याने घरांची माहिती गोळा केली जाईल, तर लोकसंख्येची प्रत्यक्ष मोजणी (व्यक्तींची गणना) फेब्रुवारी २०२७ मध्ये दुसऱ्या टप्प्यात केली जाईल.

विशेष म्हणजे, यावेळी नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजेच, प्रगणक घरी येण्यापूर्वी १५ दिवस आधी तुम्ही स्वतःहून तुमची माहिती ऑनलाइन भरू शकता.

जनगणना प्रश्नावली 2027 | Janganana Questions List 2027

सरकारी अधिसूचनेनुसार, (Janganana Questions List 2027) मध्ये एकूण ३३ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. प्रगणक तुमच्या घरी आल्यावर तुम्हाला खालील मुद्द्यांवर माहिती द्यावी लागेल:

१. घराची रचना आणि अवस्था: सुरुवातीचे प्रश्न हे घराच्या भौतिक स्थितीबद्दल असतील. यामध्ये घराचा मजला, भिंती आणि छप्पर यासाठी कोणते साहित्य (सिमेंट, पत्रे, विटा इ.) वापरले आहे, हे विचारले जाईल. तसेच घराची सद्यस्थिती चांगली आहे की पडकी आहे, याचीही नोंद घेतली जाईल.

२. घरातील सुख-सुविधा (Amenities): तुमच्या जीवनमानाचा दर्जा समजण्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील:

  • पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत कोणता आणि तो कोठे उपलब्ध आहे?
  • घरात प्रकाशाचा (Lighting) मुख्य स्त्रोत कोणता आहे?
  • संडास/शौचालयाची सुविधा आहे का? असल्यास कोणत्या प्रकारची?
  • सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते?
  • स्नानगृह (Bathroom) आणि स्वयंपाकघर (Kitchen) उपलब्ध आहे का?
  • स्वयंपाकासाठी एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन आहे का आणि मुख्य इंधन कोणते वापरले जाते?

३. संपत्ती आणि गॅझेट्स (Assets): (Janganana Questions List 2027) मधील मनोरंजक भाग म्हणजे तुमच्याकडील वस्तूंबद्दलचे प्रश्न. तुमच्याकडे रेडिओ, टेलिव्हिजन, लॅपटॉप/कॉम्प्युटर आहे का? तसेच तुम्ही इंटरनेट सुविधा वापरता का, हेही विचारले जाईल. वाहतुकीच्या साधनांमध्ये सायकल, स्कूटर/मोटारसायकल आणि कार/जीप/व्हॅन याबद्दल माहिती घेतली जाईल.

४. वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती:

  • कुटुंब प्रमुखाचे नाव आणि लिंग.
  • कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती (SC) किंवा जमातीशी (ST) संबंधित आहे का?
  • घरात राहणाऱ्या एकूण सदस्यांची संख्या आणि विवाहित जोडप्यांची संख्या.
  • घराच्या मालकीची स्थिती (स्वतःचे/भाड्याचे) तसेच, घरात प्रामुख्याने कोणते अन्नधान्य (Cereal) खाल्ले जाते, हा प्रश्नही यावेळी विचारला जाणार आहे.

५. संपर्कासाठी माहिती: सर्वात शेवटी, जनगणनेशी संबंधित माहिती आणि संपर्कासाठी तुमचा मोबाईल नंबर (केवळ जनगणनेच्या उद्देशासाठी) नोंदवून घेतला जाईल.

जनगणना 2027: 33 प्रश्नांची सविस्तर यादी | Janganana Questions List 2027

केंद्र सरकारने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी, म्हणजेच ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ साठी (Houselisting & Housing Census) विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे.

  1. इमारत क्रमांक (नगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा जनगणना क्रमांक) 
  2. जनगणना घर क्रमांक 
  3. जनगणनेच्या घराच्या जमिनीसाठी (फर्शीसाठी) वापरलेले प्रमुख साहित्य
  4. जनगणनेच्या घराच्या भिंतींसाठी वापरलेले प्रमुख साहित्य
  5. जनगणनेच्या घराच्या छतासाठी वापरलेले प्रमुख साहित्य 
  6. जनगणनेच्या घराचा वापर 
  7. जनगणनेच्या घराची स्थिती/अवस्था 
  8. कुटुंब क्रमांक 
  9. कुटुंबात सामान्यतः राहणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या 
  10. कुटुंब प्रमुखाचे नाव 
  11. कुटुंब प्रमुखाचे लिंग 
  12. कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / अन्य प्रवर्गाशी संबंधित आहे का? 
  13. घराच्या मालकीची स्थिती 
  14. कुटुंबाकडे राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या खोल्यांची संख्या 
  15. कुटुंबात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या 
  16. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत 
  17. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता 
  18. प्रकाशाचा मुख्य स्त्रोत 
  19. शौचालयाची उपलब्धता/सुलभता
  20. शौचालयाचा प्रकार 
  21. सांडपाण्याची निचरा व्यवस्था 
  22. स्नानगृहाची उपलब्धता 
  23. स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी कनेक्शनची उपलब्धता 
  24. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन 
  25. रेडिओ/ट्रान्झिस्टर 
  26. टेलिव्हिजन 
  27. इंटरनेट सुविधा 
  28. लॅपटॉप/संगणक
  29. टेलिफोन/मोबाईल फोन/स्मार्ट फोन
  30. सायकल/स्कूटर/मोटारसायकल/मोपेड 
  31. कार/जीप/व्हॅन 
  32. कुटुंबाद्वारे वापरले जाणारे मुख्य अन्नधान्य 
  33. मोबाईल नंबर (केवळ जनगणना संबंधी संवादासाठी)

जनगणना ही केवळ लोकांची मोजणी नसून, ती देशाच्या विकासाचा आरसा असते. तुम्ही दिलेली माहिती सरकारला भविष्यातील योजना आखण्यासाठी, पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि गरिबांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडते. त्यामुळे (Janganana Questions List 2027) मधील प्रश्नांची उत्तरे अचूक आणि पारदर्शकपणे देणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे.

येत्या एप्रिलपासून जेव्हा प्रगणक तुमच्या दारी येतील, तेव्हा त्यांना सहकार्य करा आणि राष्ट्रउभारणीच्या या कार्यात आपले योगदान नक्की द्या!

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment