दिव्यांग विवाहासाठी ₹2.50 लाख अनुदान! अर्ज सुरू, पात्रता व संपूर्ण माहिती

Published On: July 3, 2026
Follow Us
divyang vivah protsahan yojana apply online

दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, दिव्यांग-अव्यंग तसेच दिव्यांग-दिव्यांग विवाह करणाऱ्या पात्र दाम्पत्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेमधील सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण विभाग तसेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथील सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत मिळते?

या योजनेत दिव्यांग-अव्यंग विवाहासाठी १ लाख ५० हजार रुपये, तर दिव्यांग-दिव्यांग विवाहासाठी २ लाख ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते.

मंजूर होणारी संपूर्ण अनुदानाची रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे जमा केली जाते. मात्र, मिळालेल्या अनुदानापैकी ५० टक्के रक्कम पाच वर्षांसाठी मुदत ठेव (FD) स्वरूपात ठेवणे बंधनकारक आहे.

योजनेसाठी आवश्यक पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तीकडे किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्वाचे आधारसंलग्न वैध यूडीआयडी (UDID) कार्ड असणे आवश्यक आहे.

याशिवाय दिव्यांग वधू किंवा वर यांपैकी किमान एक जण महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विवाहाची कायदेशीर नोंदणी झालेली असणे आवश्यक असून विवाहानंतर एका वर्षाच्या आत संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे अर्ज करावा लागेल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना पुढील कागदपत्रे सादर करावी लागतील.

पती किंवा पत्नीचे यूडीआयडी कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्याचा तपशील तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.

पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत ऑनलाइन अर्ज करून अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

Divyang Vivah Protsahan Yojana Apply Online : १८ डिसेंबर २०२५ किंवा त्यानंतर विवाह केलेल्या दिव्यांग-अव्यंग तसेच दिव्यांग-दिव्यांग दाम्पत्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

punyashlok ahilyadevi holkar shetkari karjmafi yojana faq

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 : शेतकऱ्यांच्या 25 महत्त्वाच्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे

July 1, 2026
HSRP Number Plate Status Check Maharashtra

राज्यातील वाहनधारकांसाठी मोठी अपडेट! HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी शेवटची संधी, त्यानंतर 1 हजार रुपये दंड? लगेच चेक करा स्टेटस…

June 30, 2026
Divyang Vivah Protsahan Yojana

दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वाचे बदल; शासन शुद्धीपत्रक जारी

June 13, 2026
MSRTC ncmc card form

एसटी प्रवाशांसाठी NCMC कार्ड बंधनकारक! 1 ऑगस्टपासून नवे नियम; अर्जाचा नमूना PDF

June 13, 2026
Ladki Bahin Yojana May Installment Update

लाडकी बहीण योजना: मे महिन्याचा हप्ता मंजूर, पैसे खात्यात कधी येणार?

June 12, 2026
MANTRALAY NAVIN VIBHAG YADI

मंत्रालयात मोठे फेरबदल; 33 विभागांचे 45 विभागांमध्ये रूपांतर, कोणते विभाग झाले स्वतंत्र? संपूर्ण यादी

June 9, 2026

Leave a Comment