HSRP Number Plate Status Check Maharashtra : तुम्ही जर महाराष्ट्रात जुने वाहन वापरत असाल, तर ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाने राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच ‘एचएसआरपी’ (HSRP) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी आता शेवटची मुदत HSRP Number Plate Last Date in Maharashtra 30 जून 2026 पर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र दंड आकरण्यात येणार आहे.
HSRP नंबर प्लेट नसल्यास किती दंड भरावा लागेल?
HSRP नंबर प्लेट साठी मुदतवाढ मिळाली असली तरी याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. परिवहन विभागाने दिलेल्या स्पष्ट सुचनेनुसार, जे वाहन मालक या निर्धारित मुदतीमध्ये आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसवणार नाहीत किंवा त्यासाठी आगाऊ वेळ (अपॉईंटमेंट) घेणार नाहीत, त्यांच्या वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यांवर कडक तपासणी सुरू केली जाईल. या तपासणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास, मोटार वाहन कायदा आणि नियमांनुसार वाहनधारकांकडून तब्बल 1 हजार रुपयांचे तडजोड शुल्क (दंड) आकारले जाणार आहे. त्यामुळे अशी कोणतीही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वेळेतच नंबर प्लेट बदलून घेणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : HSRP Number Plate नियम, किंमत आणि अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती येथे पाहा
यापूर्वी ही नवीन सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु परिवहन विभागाच्या निदर्शनास आले की, राज्यातील केवळ 50 टक्केच जुन्या वाहनांवर एचएसआरपी बसवण्यात आली आहे. उर्वरित निम्म्या वाहनचालकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने शासनाने HSRP Number Plate Last Date ही 30 जून 2026 पर्यंत वाढवली आहे.
HSRP Number Plate Status Check Maharashtra
| HSRP Number Plate Registration Information | Click Here |
| Track HSRP Status Link 1 | Click Here |
| Track HSRP Status Link 2 | Click Here |
| Track HSRP Status Link 3 | Click Here |
ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी आणि ऑनलाइन आहे. वाहन मालकांनी HSRP बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ३० जून २०२६ पूर्वी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेणे आवश्यक आहे.
सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व वाहनधारकांना हे आवाहन केले आहे. त्यामुळे आता शेवटच्या क्षणाची वाट न बघता आजच आपल्या वाहनाची नोंदणी पूर्ण करा.







