11th Admission 1st Merit List 2025 अकरावी प्रवेशाची पहिली यादी या तारखेला जाहीर होणार

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th Admission 1st Merit List 2025 महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) ११ वी प्रवेशासंदर्भात एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, आता विद्यार्थ्यांना ११ वी साठीचे ऑनलाइन अर्ज शाळांमधूनच भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 3 जून 2025 पर्यंत अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या लेखात आपण 11 वी प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती आणि सुधारित वेळापत्रकानुसार पहिली यादी कधी जाहीर होणार? याबाबतची सविस्तर अपडेट पाहूया.

प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती

११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत २६ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाइन नोंदणी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ८ लाख ८९ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती अकरावी प्रवेशाच्या अधिकृत https://mahafyjcadmissions.in/ या वेबसाईटवर अपडेट झाली आहे. त्यानुसार ११ वी प्रवेशाची महत्वाची आकडेवारी खालीलप्रमाणे (दिनांक ५ जून पर्यंत)

  • महाविद्यालयांची एकूण संख्या (No. of Colleges): एकूण 9435 महाविद्यालये आहेत.
  • नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या (No. of Students Registered): एकूण 12,71,295 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
  • कॅप इनटेक (Cap Intake): याचा अर्थ सामान्य प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची कमाल संख्या. ती 18,97,526 आहे.
  • कोटा इनटेक (Quota Intake): आरक्षित जागांमधून (उदा. एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग इत्यादी) प्रवेश घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. ती 2,25,514 आहे.
  • एकूण इनटेक (Total Intake): हे कॅप इनटेक आणि कोटा इनटेक यांची बेरीज आहे, म्हणजेच महाविद्यालयांमध्ये एकूण किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो याची कमाल मर्यादा. ही संख्या 21,23,040
    आहे.

थोडक्यात, 9,435 महाविद्यालयांमध्ये 12,71,295 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नवीन अपडेट सविस्तर येथे वाचा

मुख्य मुद्दे:

  • ऑनलाइन अर्ज प्रणाली: राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या आणि शालेय शिक्षण विभागाच्या उच्च माध्यमिक शाखा असलेल्या शाळांमधील ११ वीचे प्रवेश आता ऑनलाइन पद्धतीने होत आहेत.
  • संकेतस्थळ आणि अर्ज भरण्याची सुरुवात: विद्यार्थ्यांना 26 मे 2025 पासून www.mahafyjcadmission.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
  • उपलब्ध जागा आणि महाविद्यालये: या प्रवेश प्रक्रियेत नोंदणीकृत महाविद्यालयांची संख्या 9,435 असून ‘CAP’ अंतर्गत 18,97,526 जागा उपलब्ध आहेत.
  • पसंतीक्रम: विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालये निवडण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावा लागणार असून अर्जात नमूद केलेल्या प्राधान्यक्रमानुसार, आराखडा आणि गुणवत्ता गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • शाळांची जबाबदारी:
    • इयत्ता १० वीचे वर्ग असलेल्या शाळांनी त्यांच्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशाचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संगणक लॅब, इंटरनेट आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
    • त्याचप्रमाणे, ११ वीचे वर्ग असलेल्या अनुदानित, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी ११ वी ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संगणक लॅब आणि इंटरनेट सुविधा पुरवावी.
  • शुल्क आकारणी नाही: या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
  • सुविधा आणि सुलभता: विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी शाळा व्यवस्थापनांना त्यांच्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अकरावी प्रवेशाची पहिली यादी या तारखेला जाहीर होणार | 11th Admission 1st Merit List 2025

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना: व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा व अल्पसंख्याक कोट्यातून मिळालेल्या प्रवेशाच्या रद्द करण्यासंदर्भातील कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी नीट समजून घ्यावी. प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांनी संमती अनिवार्यपणे नोंदवणे आवश्यक आहे.

11th Admission 1st Merit List 2025 ज्यांना प्रथम फेरीत प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी असेल. 5 जून 2025 रोजी तात्पुरती सर्वसाधारण प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीबाबत तक्रार असल्यास ऑनलाइन तक्रार अर्ज 6 व 7 जून पर्यंत सादर करता येईल. 8 जून 2025 रोजी अकरावी प्रवेशाची अंतिम यादी जाहीर होणार आहे. सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे

११वी प्रवेश प्रक्रिया २०२५ – सुधारित वेळापत्रक

वेळापत्रकानुसार शून्य फेरी गुणवत्ता यादी 8 जून 2025 रोजी जाहीर होणार असून दिनांक 9 जून ते 11 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत. तसेच कॅप फेरीची गुणवत्ता यादी 10 जून 2025 रोजी जाहीर होणार असून दिनांक 11 जून ते 18 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत.

क्रमांकदिनांककाय होणार आहे?
1२५ मे २०२५ ते ३ जून २०२५– विद्यार्थ्यांची नावनोंदणी व अर्ज भरायला सुरुवात – प्राधान्य क्रमाने १० पर्यंत महाविद्यालये निवडायची.
2५ जून २०२५– तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध
3६ जून ते ७ जून २०२५– गुणवत्ता यादीबाबत तक्रार असल्यास ऑनलाइन तक्रार अर्ज सादर करता येईल
4८ जून २०२५– अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध
5९ जून ते ११ जून २०२५शून्य फेरी प्रवेश (यामध्ये फक्त कोटा / अल्पसंख्याक / संस्था अंतर्गत विद्यार्थी) – जर शाळा मंजूर असेल तर “Proceed for Admission” वर क्लिक करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
6११ जून ते १८ जून २०२५प्रवेश फेरी क्रमांक १ – फेरीत शाळा मिळाल्यास “Proceed for Admission” वर क्लिक करणे – लागणारी कागदपत्रे घेऊन शाळेत जाऊन प्रवेश पूर्ण करणे – फेरी मिळाली नसेल तर पुढील फेरीसाठी पसंतीक्रम अपडेट करता येईल
7२० जून २०२५प्रवेश फेरी क्रमांक २ साठी रिक्त जागांची यादी जाहीर होईल (कोटा जागांसाठी)
11th Admission Time Table
11th Admission Time Table 2025

मार्गदर्शन व सहाय्यता: विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मदत मिळावी, तसेच महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची तपासणी योग्यरित्या व्हावी यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती माहिती पुस्तिकेत व ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावर मार्गदर्शन व मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तांत्रिक अडचण किंवा इतर मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी सहाय्यता क्रमांकः ८५३०९५५५६४ वर अथवा ई-मेल : support@mahafyjcadmissions.in वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्याhttps://mahafyjcadmissions.in/

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!