11th Admission Notice 2025 अकरावी प्रवेशाची वाट पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! शिक्षण विभागाने FYJC प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आता तुम्हाला तुमच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
11th Admission Notice 2025 | तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रकात बदल
11th Admission Notice 2025 १९ मे रोजी ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी पोर्टल सुरु करण्यात आले होते. विद्यार्थी आणि पालकांना सरावासाठी हे पोर्टल उपलब्ध करून दिले होते. या दरम्यान, राज्यभरातील पालक, विद्यार्थी, अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांकडून अनेक महत्त्वाच्या सूचना मिळाल्या. या सूचनांचा समावेश करण्यासाठी तांत्रिक बदल करण्याची गरज होती. ती आता पूर्ण झाली आहे.
विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार
जरी अर्ज भरण्याची प्रक्रिया काही प्रमाणात लांबणीवर पडली असली तरी, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आणि पसंतीक्रम नोंदवण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. पोर्टल पूर्णपणे निर्दोष आणि उत्कृष्ट स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पोर्टल सुरु होण्याची वेळ ऑनलाइन दर्शवली जाईल आणि विद्यार्थ्यांना ई-मेल तसेच मोबाईल संदेशाद्वारे याची माहिती दिली जाईल. अपूर्ण किंवा त्रुटी असलेल्या अर्जांना परवानगी देण्याऐवजी, एक परिपूर्ण आणि त्रुटीरहित पोर्टल सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.
11 वी ऑनलाईन ॲडमिशन सुरू! आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी!
काळजी करू नका, सर्व मदत उपलब्ध
शिक्षण संचालनालयाने विद्यार्थी आणि पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी गोंधळून जाऊ नये. अर्ज भरण्याची प्रक्रिया सोयीची आणि कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ, योग्य सोयी-सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.
या प्रक्रियेची व्यापक प्रसिद्धी व्हावी अशी विनंतीही करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि पालक https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा support@mahafyjcadmissions.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकतात. मदतीसाठी ८५३०९५५५६४ या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क साधता येईल.
सुधारित वेळापत्रक जाहीर
इ. अकरावी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी मित्रहो आणि पालक बंधू, भगिनी, इयत्ता ११ वी प्रवेश पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा सोमवार, दि. २६ मे २०२५ सकाळी ११.०० पासून सुरू होत असल्याची माहिती शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या मार्फत देण्यात आली आहे.
इयत्ता ११ वी प्रवेश नोंदणी कालावधी : २६ मे २०२५ (सकाळी ११:०० वाजेपासून) ते ०३ जून २०२५ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत)



11th Online Admission Official Website : mahafyjcadmissions.in
