राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट

Published On: July 7, 2026
Follow Us
pavsacha andaaz 2026

मुंबई वेधशाळेने राज्यासाठी पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, विविध भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ७ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

७ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरघाट,अहिल्यानगर, धुलेजळगाव, वाशीम आणि वर्धा, नागपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, सातारा घाट आणि अमरावती येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

८ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे यलो अलर्ट राहणार असून, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असेल.

९ जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१० जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम राहणार आहे. ११ जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई वेधशाळेने नागरिकांनी स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

pavsacha andaj

संपूर्ण पावसाचा जिल्हा निहाय अंदाज IMD अहवाल pdf डाउनलोड करा

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी

मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची, शहरांतील रस्ते जलमय होण्याची तसेच घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी रस्त्यांची आणि वाहतुकीची अद्ययावत माहिती घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

अरबी समुद्रातील प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी आणि पशुपालकांसाठी महत्त्वाचा सल्ला

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भातशेती आणि भाजीपाल्याच्या रोपवाटिकांमध्ये साचलेले अतिरिक्त पाणी तातडीने बाहेर काढण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. तसेच जनावरांना सुरक्षित गोठ्यात ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन पशुपालकांना करण्यात आले आहे.

हवामान पाऊस अंदाज IMD PDF डाउनलोड

pavsacha andaaz imd 2026

संपूर्ण पावसाचा अंदाज IMD अहवाल pdf डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment