MAH BEd ELCT CET Result 2025 महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) MAH – B.Ed & ELCT CET 2025 या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या उत्तरतालिकांवरील आक्षेपांचे निराकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या परीक्षा २६ एप्रिल २०२५ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात ६ सत्रांमध्ये घेण्यात आल्या होत्या.
MAH BEd ELCT CET Result 2025 अपडेट संपूर्ण माहिती
परीक्षेचे तपशील
- प्रवेश परीक्षेचे नाव : MAH-B.Ed & ELCT CET 2025
- नोंदणी केलेले एकूण उमेदवार : 79,083
- प्रत्यक्ष परीक्षा दिलेले उमेदवार : 72,378
- परीक्षा कालावधी: 24 मार्च टे 26 मार्च 2025
या परीक्षेनंतर, उमेदवारांना उत्तरतालिका तपासण्यासाठी आणि त्यावर आक्षेप असल्यास ते नोंदवण्यासाठी सीईटी कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ उपलब्ध करून देण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त झालेल्या आक्षेपांची तपासणी तज्ञांच्या समितीमार्फत करण्यात आली आहे.
आक्षेपांची सविस्तर माहिती:
प्राप्त आक्षेपांनुसार, B.Ed CET 2025 साठी ‘मेंटल ऍबिलिटी’ विभागात ६ आक्षेप प्राप्त झाले होते, त्यापैकी ४ आक्षेप वैध ठरवून त्यांचे निराकरण करण्यात आले. ‘जनरल नॉलेज’ विभागात ३ आक्षेप प्राप्त झाले होते, त्यापैकी २ आक्षेप वैध ठरले. अशा प्रकारे, B.Ed CET साठी एकूण ९ आक्षेपांपैकी ६ आक्षेप मंजूर करण्यात आले.
ELCT CET 2025 साठी ‘सेंटेन्स फॉर्मेशन’, ‘फोनेटिक्स’ आणि ‘फिगर्स ऑफ स्पीच’ या प्रत्येक विभागात प्रत्येकी १ आक्षेप प्राप्त झाला होता आणि हे सर्व आक्षेप वैध ठरवून त्यांचे निराकरण करण्यात आले. म्हणजेच, ELCT CET साठी प्राप्त झालेले एकूण ३ आक्षेप मंजूर करण्यात आले.
तज्ञांच्या अहवालानुसार घेतलेली कारवाई:
तज्ञांच्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, काही प्रश्नांच्या उत्तरतालिकांमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर एका प्रश्नासाठी (प्रश्न क्रमांक 201641, B.Ed CET, 25/03/2025, संध्याकाळचे सत्र, मेंटल ऍबिलिटी) त्याचे सर्व पर्याय अनुचित असल्याने संबंधित उमेदवारांना पूर्ण गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या आक्षेपांमध्ये उत्तरतालिका योग्य असल्याचे आढळले, तेथे कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बदल केलेल्या प्रश्न आणि त्यावरील कारवाईची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
- २५/०३/२०२५, सकाळचे सत्र, जनरल नॉलेज (प्रश्न क्र. 201590): उत्तरतालिका बदलली.
- २५/०३/२०२५, सकाळचे सत्र, मेंटल ऍबिलिटी (प्रश्न क्र. 201539): उत्तरतालिका बदलली.
- २५/०३/२०२५, संध्याकाळचे सत्र, मेंटल ऍबिलिटी (प्रश्न क्र. 201641): सर्व पर्याय अनुचित असल्याने पूर्ण गुण दिले.
- २५/०३/२०२५, संध्याकाळचे सत्र, मेंटल ऍबिलिटी (प्रश्न क्र. 201652): उत्तरतालिका बदलली.
- २५/०३/२०२५, संध्याकाळचे सत्र, जनरल नॉलेज (प्रश्न क्र. 201674): उत्तरतालिका योग्य असल्याने कोणताही बदल नाही.
- २६/०३/२०२५, संध्याकाळचे सत्र, मेंटल ऍबिलिटी (प्रश्न क्र. 201902): उत्तरतालिका बदलली.
- २५/०३/२०२५, संध्याकाळचे सत्र, ELCT सेंटेन्स फॉर्मेशन (प्रश्न क्र. 201756): उत्तरतालिका बदलली.
- २६/०३/२०२५, संध्याकाळचे सत्र, ELCT फोनेटिक्स (प्रश्न क्र. 202013): उत्तरतालिका बदलली.
- २६/०३/२०२५, संध्याकाळचे सत्र, ELCT फिगर्स ऑफ स्पीच (प्रश्न क्र. 202019): उत्तरतालिका बदलली.
MAH BEd ELCT CET Result 2025 तज्ञांनी केलेल्या या बदलांना आता डेटाबेसमध्ये समाविष्ट केले जाईल आणि त्यानुसार MAH – B.Ed & ELCT CET 2025 चा निकाल तयार केला जाईल. परीक्षेचा स्कोअरकार्ड लवकरच उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिला जाईल, ज्यात संबंधित ग्रुपसाठी पर्सेटाईल नमूद केले असेल.
या आक्षेपांसंदर्भात सीईटी सेलकडे कोणताही पुढील पत्रव्यवहार किंवा संपर्क केला जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी ही सूचना देण्यात आली आहे.
MAH BEd ELCT CET Result 2025 निकाल कोठे आणि कसा पाहावा? डायरेक्ट लिंक
स्टेप 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- MAH B.Ed. ELCT CET 2025 चा निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर जा:
https://cetcell.mahacet.org
स्टेप 2: CET परीक्षेच्या विभागात जा
- मुख्य पेजवर “B.Ed. & B.Ed. ELCT CET 2025” ह्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: “Result” किंवा “Score Card” लिंक निवडा
- त्या पेजवर “View Score Card / Result” अशी लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
स्टेप 4: लॉगिन तपशील भरा
- तुमचा Registered Email ID (Application Number) आणिPassword टाका.
- Sign in बटणावर क्लिक करा.
स्टेप 5: निकाल पाहा आणि डाऊनलोड करा
- आता तुमचा MAH B.Ed. ELCT CET 2025 निकाल स्क्रीनवर दिसेल.
- तो PDF स्वरूपात सेव्ह करा आणि भविष्यासाठी प्रिंट काढा.
अधिक माहिती आणि निकालासाठी उमेदवारांनी नियमितपणे महाराष्ट्र सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
