MAH MCA CET Result 2025 नर्सिंग आणि इतर परीक्षांचे निकाल जाहीर, डायरेक्ट लिंक

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MAH MCA CET Result 2025 महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (Maharashtra Common Entrance Test Cell) MAH MCA CET, MH Nursing CET 2025 व इतर महत्वाच्या सीईटी परीक्षांचे निकाल (Result ) जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, ते आता त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर पाहू शकतात. कोणत्या परीक्षांचे Score Cards are Live झाले आहे? आणि निकाल पाहण्यासाठीची Direct Link या लेखात दिली आहे.

MAH MCA CET Result 2025 सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड चा वापर करून लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, त्यांना त्यांचा MAH MCA CET 2025 व इतर CET चा स्कोअर कार्ड दिसेल, ज्यामध्ये त्यांचे गुण आणि रँक नमूद केलेले असतील.

या निकालामध्ये मिळालेले गुण आणि रँक हे विविध MCA (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाचे असतील.

MAH MCA CET Result 2025 सीईटी परीक्षांचे स्कोअर कार्ड लाईव्ह!

Score Cards are Live for

  1. MAH-Nursing CET-2025
  2. MH-BHMCT/MHMCT(Integrated)-CET 2025
  3. MAH-MCA CET-2025
  4. MH-DPN/PHN CET
  5. MAH-M.P.Ed CET-2025
  6. MAH-B.P.Ed CET-2025.

Kindly Download from Candidate Login.

निकाल पाहण्याची सोपी पद्धत:

  1. सर्वात आधी, महाराष्ट्र सीईटी सेलची अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा. (डायरेक्ट लिंक खाली दिली आहे.)
  2. वेबसाइटवर तुम्हाला Score Cards are Live for MHT CET परीक्षांचे नाव दिसतील त्यासमोरील लिंकवर क्लिक करा.
  3. आता तुम्हाला तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
  4. माहिती भरून झाल्यावर “Sign in” बटनावर क्लिक करा.
  5. तुमचा निकाल म्हणजेच स्कोअर कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तो डाउनलोड करून प्रिंट करू शकता.
MHT CET Result 2025

या स्कोअर कार्डमध्ये तुम्हाला तुमच्या परीक्षेत मिळालेले गुण आणि रँकची माहिती मिळेल. ही माहिती पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

MHT CET Result 2025 : Direct Link Click Here

अधिकृत वेबसाईट : https://cetcell.mahacet.org/

महत्त्वाच्या गोष्टी:

  • प्राप्त झालेल्या गुणांमध्ये किंवा रँकमध्ये कोणत्याही बदलाची विनंती प्राधिकरणांकडून स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे तुमचा निकाल काळजीपूर्वक तपासा.
  • अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) देखील लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहे.
  • जे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरतील, त्यांना MAH MCA CET 2025 च्या समुपदेशन (Counselling) प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल.

MAH MCA CET 2025 चा कटऑफ (Cutoff):

प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच कटऑफ जाहीर केला जाईल. हा कटऑफ विविध घटकांवर अवलंबून असतो, जसे की परीक्षेची काठिण्य पातळी, परीक्षार्थींची संख्या आणि मागील वर्षांचे कटऑफ ट्रेंड. जो विद्यार्थी हा कटऑफ पूर्ण करेल, त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त असेल.

MAH MCA CET 2025 समुपदेशन प्रक्रिया (Counselling Process):

पात्र विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन प्रक्रियेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. ही प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने (Centralised Admission Process – CAP) आयोजित केली जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची आवडती महाविद्यालये आणि अभ्यासक्रम प्राधान्यक्रमाने भरावे लागतील. त्यानंतर, त्यांच्या रँकनुसार आणि उपलब्ध जागांनुसार त्यांना महाविद्यालये आवंटित केली जातील.

त्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांनी MAH MCA CET 2025 ची परीक्षा दिली आहे, त्यांनी त्वरित अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला निकाल पाहावा आणि पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तयार राहावे!

MHT-CET Exam 2025

  • परीक्षेचे नाव: MHT-CET 2025
  • नोंदणी केलेले उमेदवार: 7,25,773
  • परीक्षा दिलेले उमेदवार: 6,75,445

MHT CET PCB, PCM Exam 2025 ची Answer Key मे 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना आपला रजिस्टर केलेला ईमेल आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागेल. PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) आणि PCB (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) दोन्ही गटांसाठी उत्तरतालिका एकत्र जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तरतालिका पाहून उमेदवार आपले अंदाजित गुण तपासू शकतात.

MHT CET 2025 Important Dates

परीक्षेचे नावतारीख
MHT CET 2025 Exam Date for PCB Group9 एप्रिल 2025 ते 17 एप्रिल 2025
MHT CET 2025 Exam Date for PCM Group19 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025
MHT CET 2025 Re-exam for PCM Group5 मे 2025
MHT CET 2025 Answer Key Release Dateमे 2025 (अपेक्षित)
MHT CET 2025 Result Dateजून 2025 (अपेक्षित)

MHT CET 2025 Answer Key कशी डाउनलोड करायची?

  1. CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या 👉 cetcell.mahacet.org
  2. “MHT CET 2025 Answer Key” या लिंकवर क्लिक करा.
  3. आपला रोल नंबर व जन्मतारीख/ईमेल आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  4. स्क्रीनवर उत्तरतालिका, रिस्पॉन्स शीट आणि प्रश्नपत्रिका दिसतील – डाउनलोड करा किंवा प्रिंट काढा.

उत्तरतालिकेवर हरकत घेण्याची संधी

जर एखाद्या उत्तरावर तुम्हाला शंका असेल, तर उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकत घेण्याची संधी मिळणार आहे. CET Cell सर्व हरकतींचा आढावा घेऊन अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करेल. अंतिम उत्तरतालिकेनंतरच निकाल जाहीर केला जाणार आहे.

सर्व संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कोअर कार्डसाठी शुभेच्छा! पुढील प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाइटला नियमितपणे भेट देत राहा.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!