CET Cell Caste Validity Notice SEBC-OBC विद्यार्थ्यांसाठी CET Cell ची मोठी घोषणा! 14 मेपासून कार्यवाही सुरू!

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CET Cell Caste Validity Notice राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई (CET Cell) कडून एक अत्यंत महत्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या SEBC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक १४ मे २०२५ पासून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतच्या सविस्तर सूचना पाहूया.

CET Cell Caste Validity Notice संपूर्ण माहिती

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उच्च शिक्षण विभागाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये SEBC (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग) आणि OBC (इतर मागास प्रवर्ग) या गटांतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना CET Cell कडून जाहीर करण्यात आली आहे.

CET Cell Caste Validity Notice महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ०२ मे २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, SEBC (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग) आणि OBC (इतर मागास प्रवर्ग) या दोन्ही प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. या मुदतीनुसार, सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.

परंतु, अजूनही अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र कॉलेजमध्ये जमा केलेले नाही किंवा CAP पोर्टलवर अपलोड केलेले नाही. त्यामुळे, दिनांक १४ मे २०२५ पासून महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना याबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत:

सूचना

१. प्रमाणपत्र उपलब्ध आहे पण अपलोड केले नाही: ज्या विद्यार्थ्यांकडे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र तयार आहे, परंतु त्यांनी ते अद्याप CAP पोर्टलमध्ये अपलोड केलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ आपले प्रमाणपत्र ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे, तिथे जमा करावे. कॉलेजने ते प्रमाणपत्र त्यांच्या लॉगिनमधून CAP पोर्टलवर त्वरित अपलोड करावे.

२. प्रमाणपत्र अजून मिळाले नाही: ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही, अशांनी लवकरात लवकर संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून ते मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते निर्धारित वेळेत (१ ऑगस्ट २०२५ पर्यंत) प्रवेशित कॉलेजमध्ये जमा करावे. कॉलेजने ते प्रमाणपत्र त्यांच्या लॉगिनमधून CAP पोर्टलवर अपलोड करावे.

३. जमा केले असल्यास खात्री करा: ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र कॉलेजमध्ये जमा केले आहे, त्यांनी आणि कॉलेजने सुद्धा ते CAP पोर्टलमध्ये अपलोड झाले आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.

महत्त्वाची नोंद:

ज्या विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीत (म्हणजेच १ ऑगस्ट २०२५ पर्यंत) जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येणार नाही, त्यांच्या प्रवेशाबाबत शासनाच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल.

यासाठी, सर्व संबंधित विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांनी या सूचनांची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे. प्रवेश कायम ठेवण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी : CET Cell कडून जाहीर केलेली सूचना येथे पाहा

CET Cell Caste Validity Notice

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!