Pre school Registration : वय 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी खासगी प्री-स्कूल नोंदणी बंधनकारक

Published On: May 13, 2025
Follow Us
Pre school Registration

Pre school Registration महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वय वर्षे 3 ते 6 वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी केंद्रांची नोंदणी आता अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी education.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट वर सात दिवसाच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या पार्श्वभूमीवर निर्णय

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार, शिक्षण संरचनेत ५+३+३+४ असा नवा आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या पाच वर्षांत वय वर्षे ३ ते ८ वयोगटातील शिक्षणाचा समावेश आहे. या टप्प्याला “पायाभूत स्तर” असे नाव देण्यात आले आहे.

राज्य सरकारने यासाठी स्वतंत्र राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCFFS) तयार केला आहे. त्यामध्ये ३ ते ८ वयोगटातील प्रत्येक मुलाला सुरक्षित, दर्जेदार आणि मोफत शिक्षण सुविधा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आत्तापर्यंत सरकारी अंगणवाड्या आणि शाळेशी संलग्न बालवाड्यांची माहिती शासनाकडे उपलब्ध होती, मात्र खासगी पूर्व प्राथमिक केंद्रांची अधिकृत नोंदणी नव्हती. त्यामुळे आता या सर्व केंद्रांची माहिती एकत्र करणे गरजेचे झाले आहे.

खासगी प्री-स्कूलसाठी नोंदणी कशी करावी? | Pre school Registration

पूर्व प्राथमिक शिक्षण देणा-या खाजगी केंद्रांच्या नोंदणीची सुविधा https://education.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळावर web links मध्ये उपलब्ध असलेल्या Pre. School Registration portel (ECCE) या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यामध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील विदयार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणा-या खाजगी केंद्रांची सर्वसाधारण माहिती, व्यवस्थापनाची माहिती, विद्यार्थी संख्या, भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नोंद पोर्टलवर करावयाची आहे. सदर पोर्टलवर माहितीची नोंद करायची आहे व पुढील कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

  • शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबाबत गुणपत्रक/प्रमाणपत्र
  • इमारत पूर्णत्वाचा दाखला (Building Completion Certificate)
  • आरोग्य स्वच्छता प्रमाणपत्र- (Cleanliness Maintenance Certificate) नमूना खाली दिलेल्या परिपत्रका सोबत जोडला आहे.
Pre school Registration
Pre school Registration 2025

Pre school Registration महत्वाच्या सुचना

  1. अर्जामध्ये नमूद केलेली सर्व आवश्यक माहिती भरावी.
  2. अर्जाच्या तळाशी असलेला ‘Save As Draft’ बटण क्लिक करावे. माहिती जतन केल्यानंतर ‘Principal/Head Master/In-charge Mobile’ या रकाण्यात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर Pre-School Registration Number एसएमएसद्वारे प्राप्त होईल.
  3. अर्जाच्या वरच्या भागातील ‘Update and Finalize Pre-School Details’ बटण क्लिक करावे. प्राप्त झालेला Pre-School Registration Number प्रविष्ट करा. त्यानंतर, शाळेची माहिती अद्यावत (Update) करून ‘Finalize’ बटण क्लिक करावे.
  4. ‘Finalize’ बटण दाबल्यानंतर, ‘Principal/Head Master/In-charge Mobile’ या रकाण्यात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होईल. ओटीपी योग्य असल्यास, पुढील संदेश दिसेल: “Data is finalized, and your registration is completed successfully.”
  5. ‘Update and Finalize Pre-School Details’ विभागातील ‘Finalize’ बटण क्लिक केल्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही.
  6. ‘Print’ बटणाद्वारे नोंदणीसंबंधित माहिती जतन व मुद्रित करता येईल.
  7. ‘Update and Finalize Pre-School Details’ विभागात Pre-School Registration Number प्रविष्ट करून कोणत्याही वेळी नोंदणीसंबंधित माहिती पाहता येईल.

अधिक माहितीसाठी: शासन निर्णय येथे डाउनलोड करा | परिपत्रक आणि नमूना येथे डाउनलोड करा | PreSchool Registration Manual

Pre school Registration

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

RTE Admission Documents List 2026

आरटीई फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? पालकांनो ही यादी आताच तपासा!

January 13, 2026
Maharashtra Board Time Table 2026 Download

10 वी , 12 वी बोर्ड परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध, या तारखेपासून प्रॅक्टिकल आणि लेखी परीक्षा; अधिकृत वेळापत्रक पाहा

January 12, 2026
12th Board Exam Hall Ticket Released

12 वीचे हॉल तिकीट जाहीर! नावात चूक झाली किंवा हॉल तिकीट हरवल्यास ‘हा’ आहे सोपा उपाय

January 12, 2026
hsc hall ticket 2026 release date

प्रतीक्षा संपली! १२ वीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ‘या’ तारखेपासून मिळणार; बोर्डाची मोठी अपडेट

January 12, 2026
Maharashtra Scholarship Exam 2026 27

महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा ‘बदल’! नवीन ‘अधिसूचना’ जाहीर; पहा विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्ती’ची ‘रक्कम किती’ मिळणार? संपूर्ण माहिती

January 11, 2026
RTE Admission Process Information 2025 26

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे – ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती RTE Admission Process Information 2026 27

January 11, 2026

Leave a Comment