New Education Policy in Maharashtra शालेय शिक्षण विभागाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शालेय शिक्षण पद्धतीत मोठे बदल होणार याबाबतचा शासन निर्णय New Education Policy 2025 PDF दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Table of Contents
New Education Policy in Maharashtra
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (State Council of Educational Research And Training, Maharashtra), पुणे यांचेमार्फत तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४, तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मधील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्या-टप्प्याने लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये 8 महत्वाचे निर्णय पाहूया.
1. नवीन आकृतीबंध रचना (5+3+3+4) लागू
पूर्वीच्या 10+2 या पारंपरिक रचनेऐवजी आता 5+3+3+4 या चार टप्प्यांची रचना लागू करण्यात आली आहे:

टप्पा | वयोगट | इयत्ता |
---|---|---|
पायाभूत स्तर | वय 3 ते 8 | बालवाटिका 1, 2, 3 + इयत्ता 1 ली व 2 री |
पूर्वतयारी स्तर | वय 8 ते 11 | इयत्ता 3 री ते 5 वी |
पूर्वमाध्यमिक स्तर | वय 11 ते 14 | इयत्ता 6 वी ते 8 वी |
माध्यमिक स्तर | वय 14 ते 18 | इयत्ता 9 वी ते 12 वी |
या टप्प्यांनुसार पुढे शिक्षणाची आखणी, अभ्यासक्रम आणि मूल्यांकन होणार आहे.
2. अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
New Education Policy in Maharashtra नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025-26 पासून सुरू होणार असून, पुढीलप्रमाणे इयत्तानिहाय टप्पे निश्चित करण्यात आले आहेत:
- 2025-26: इयत्ता 1 ली
- 2026-27: इयत्ता 2 री, 3 री, 4 थी व 6 वी
- 2027-28: इयत्ता 5 वी, 7 वी, 9 वी व 11 वी
- 2028-29: इयत्ता 8 वी, 10 वी व 12 वी
बालवर्ग (बालवाटिका 1, 2, 3) साठी स्वतंत्र निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने घेतला जाईल.

3. भाषाशिक्षण धोरणात महत्त्वाचा बदल
सद्यस्थितीत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत केवळ दोन भाषा अभ्यासल्या जात आहेत. उर्वरित माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सुत्रानुसार मराठी व इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जात आहेत.
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार यापुढे इयत्ता १ ली ते ५ वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता ६ वी ते १० वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असणार आहे.
4. सेतू अभ्यासक्रम राबवणार
नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांना योग्य पायाभूत समज मिळावी यासाठी ‘सेतू अभ्यासक्रम’ (Bridge Course) तयार केला जाईल. हा कोर्स संबंधित इयत्तांमध्ये लागू केला जाईल.
5. नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके
- NCERT च्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येईल.
- अभ्यासक्रम अनुभवाधारित, रंजक व समावेशक असेल.
- मजकूर कमी करून मुलांचे ताण कमी करणे, संख्याज्ञान, सर्जनशीलता, तार्किक विचारशक्ती वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट राहील.
6. विषय योजना (Subject Mapping)
राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवीन विषय योजना तयार करण्यात आली आहे. ही योजना टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये लागू केली जाईल आणि त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.
7. मूल्यांकन पद्धतीत सुधारणा
नवीन धोरणात विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यमापन (Holistic Progress Card – HPC) महत्त्वाचे ठरणार आहे. गुणांऐवजी कौशल्य, सहभाग, विचार, सर्जनशीलता इत्यादींचे मूल्यमापन केले जाईल. ही पद्धत SCERT मार्फत विकसित केली जाईल.
8. शालेय वेळापत्रक आणि तासिकांचे नियोजन
नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्तानिहाय वेळापत्रक, तासिकांची संख्या, सत्रांचे कालावधी आणि मूल्यांकन परीक्षा यांचे नियोजन करण्यात येईल. हे वेळापत्रक संलग्न संचालक मंडळाच्या सल्ल्याने ठरवले जाईल.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शालेय शिक्षण अधिक शास्त्रीय, मुलाभूत व गुणवत्तापूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शिक्षणात राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी करताना महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाऊल पुढे टाकले आहे.
New Education Policy 2025 PDF
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची महराष्ट्र राज्यात टप्प्याटप्याने अमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यात NEP धोरण लागू करण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर कार्यपद्धती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. New Education Policy 2025 PDF तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर डाउनलोड करू शकता.
अधिक माहितीसाठी: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शासन निर्णय डाउनलोड करा
New Education Policy 2020 PDF Download Here
हे ही वाचा: CBSE Pattern Maharashtra: राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम अशा पद्धतीने लागू होणार