राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर सूचना – CET Cell Caste Validity Notice 2025

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CET Cell Caste Validity Notice 2025 शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील विविध तंत्रशिक्षण, वैद्यकीय (Medical) व आयुष (AYUSH) व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये SEBC आणि OBC प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कडून (CET Cell Maharashtra) जारी करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०२ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, विद्यार्थ्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

CET Cell Caste Validity Notice 2025

जाहीर सूचना – 1

प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम तारीख

शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकरीता एसईबीसी (SEBC) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी २ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे.

CET Cell Caste Validity Notice 2025 पात्र विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व SEBC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ०१/०८/२०२५ पर्यंत आपले प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे ही सूचना?

  • ज्यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात SEBC किंवा OBC प्रवर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे.
  • ज्यांनी प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्राची पावती (Acknowledgement) सादर केली होती.
  • जे अद्याप प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत आहेत किंवा ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे परंतु महाविद्यालयात जमा केलेले नाही.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे, अशा उमेदवारांनी त्यांचे मूळ जात वैधता प्रमाणपत्र त्यांचे प्रवेशित महाविद्यालयात तात्काळ जमा करावे.
  2. तसेच ज्या उमेदवारांना अद्याप पर्यंत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्राप्त झालेले नाही अशा उमेदवारांनी संबंधित जिल्हा पडताळणी समितीकडून आपले जात वैधता प्रमाणपत्र दिनांक ०१/०८/२०२५ पुर्वी प्राप्त करुन घेण्यात यावे आणि प्राप्त होताच प्रवेशित महाविद्यालयात जमा करावे.
  3. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन संबंधित महाविद्यालयात जमा न केल्यास उमेदवाराचा प्रवेश रद्द होवू शकतो याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

महाविद्यालयांसाठी सूचना:

  1. महाविद्यालयाने एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातून जात वैधता प्रमाणपत्राच्या पावतीच्या आधारे ज्या उमेदवारांना प्रवेश दिला आहे अशा उमेदवारांकडून त्यांचे मूळ जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधीत जमा करुन घ्यावे व सदर प्रमाणपत्र महाविद्यालयाने कॉलेज फिडबँक पोर्टलमध्ये महाविद्यालयाचे लॉगीनद्वारे तात्काळ अपलोड करावे. (प्रमाणपत्र अपलोड करण्याबाबतची कार्यपध्दती स्वतंत्र ई-मेलद्वारे महाविद्यालयास कळविण्यात येईल.)
  2. ज्या, उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालयामध्ये जमा केले असेल तर सदर महाविद्यालयाने कॅप पोर्टलमध्ये सदर प्रमाणपत्र अपलोड केले आहे की नाही याबाबत खातरजमा करावी व अपलोड केलेले नसल्यास तात्काळ अपलोड करावे.
  3. महाविद्यालयाने आपल्याकडे एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातून प्रवेशित सर्व उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र असल्याची खातरजमा करावी व वरील प्रमाणे कार्यवाही करावी. तसेच सदर सूचना संबंधित उमेदवारांचे तात्काळ निर्दशनास आणावी.

या सूचनेनुसार, सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांनी ०१ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख लक्षात ठेवून आवश्यक ती कारवाई तात्काळ पूर्ण करावी. उशीर झाल्यास प्रवेश रद्द होण्याची शक्यता असून, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

Important-Notice_SEBC-OBC-candidate_CVC-Submission
Important-Notice_SEBC-OBC-candidate_CVC-Submission

अधिक माहितीसाठी : CET Cell कडून जारी करण्यात आलेली सूचना येथे डाउनलोड करा

जाहीर सूचना – 2

CET Cell Caste Validity Notice 2025 शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये तंत्रशिक्षण विभागाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काही उमेदवारांनी एसईबीसी (SEBC) आणि ओबीसी (OBC) या आरक्षित प्रवर्गांतून प्रवेश घेतला आहे. मात्र, यापैकी काही विद्यार्थ्यांनी अजूनही आपले जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर केलेले नाही.

राज्य शासनाने अशा विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आधीही वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे. आणि आता २ मे २०२५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार, अजून तीन महिने म्हणजेच २ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंतिम संधी दिली आहे.

महत्त्वाचे निर्देश – कोण काय करायचं?

१. जात वैधता प्रमाणपत्र आहे पण अपलोड केलेलं नाही:

  • जर तुमच्याकडे प्रमाणपत्र आधीपासूनच उपलब्ध आहे, पण ते तुम्ही प्रवेश प्रक्रियेत अपलोड केलेलं नसेल, तर ते तात्काळ तुमच्या लॉगिनमधून अपलोड करा.

२. जात वैधता प्रमाणपत्र अजून मिळालेलं नाही:

  • तुमचं प्रमाणपत्र अजून आलेलं नसेल, तर ते त्वरित जिल्हा जात पडताळणी समितीकडून मिळवून घ्या.
  • प्रमाणपत्र मिळाल्यावर ताबडतोब लॉगिनमधून अपलोड करा.

३. प्रमाणपत्र महाविद्यालयात दिलं आहे, पण अपलोड केलेलं नाही:

  • जर तुम्ही प्रमाणपत्र महाविद्यालयात दिलं असेल पण CAP पोर्टलवर अपलोड केलं नसेल, तर तेही तात्काळ स्वतःच्या लॉगिनमधून अपलोड करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही २ ऑगस्ट २०२५ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र अपलोड केलं नाही, तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो.
या परिणामाला फक्त विद्यार्थीच जबाबदार असतील. त्यामुळे ही अंतिम संधी गमावू नका!

अधिक माहितीसाठी : CET Cell कडून जारी करण्यात आलेली सूचना 2 येथे डाउनलोड करा

Cet cell Notice SEBC OBC

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!