महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय! CBT परीक्षा पद्धती स्थगित; पूर्व परीक्षा OMR पद्धतीनेच होणार

Published On: July 23, 2026
Follow Us
mpsc exam update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक-आधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णय जुलै 2027 पर्यंत स्थगित केला आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाने 22 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केले आहे.

mpsc exam update

आयोगाने 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात सन 2027 पासून या पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

मात्र, विविध उमेदवारांकडून या परीक्षा प्रचलित ऑफलाइन OMR पद्धतीनेच घेण्यात याव्यात, अशी अनेक निवेदने आयोगाकडे प्राप्त झाली होती. या निवेदनांचा विचार करून आयोगाने संगणक-आधारित परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय सध्या स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या जुलै 2027 पर्यंत विद्यमान OMR आधारित पद्धतीनेच आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे.

आयोगाच्या या निर्णयामुळे CBT पद्धतीबाबत साशंक असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी परीक्षांसाठी ते सध्याच्या परीक्षा पद्धतीनुसार तयारी सुरू ठेवू शकतील.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

arogya sevika bharti new gr

आरोग्य सेविका भरतीसाठी मोठा बदल; पात्रता गुणांची मर्यादा 45 वरून 35 टक्के – शासन निर्णय

August 13, 2026
shikshaketar-padbharti-GR

राज्यातील या शाळांमध्ये शिक्षकेतर पदभरतीला शासनाची मंजुरी; 80 टक्के पदे भरता येणार

August 12, 2026
Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ; 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 11, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026

Leave a Comment