Digilocker CBSE Result 2025 सीबीएसई बोर्डाकडून निकालासंदर्भात महत्वाचे परिपत्रक जारी

Published On: May 13, 2025
Follow Us
Digilocker CBSE Result 2025

Digilocker CBSE Result 2025 : सीबीएसई बोर्डाकडून निकालासंदर्भात एक महत्वाचे परिपत्रक जारी केले आहे. इयत्ता 10 वी व १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी डिजीलॉकर (DigiLocker) वर आपले मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डिजिटल स्वरूपात पाहू आणि डाउनलोड करू शकतात.

CBSE इयत्ता 12 वीचा 2025 चा निकाल जाहीर झाला असून यंदा एकूण पास टक्केवारी 88.39% इतकी नोंदवली गेली आहे. 2024 मध्ये ही टक्केवारी 87.98% होती, त्यामुळे यंदा थोडीशी वाढ झाली आहे.

Digilocker CBSE Result 2025

एकूण 17,04,367 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 16,92,794 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते आणि त्यापैकी 14,96,307 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

भागनिहाय कामगिरीत विजयवाडा विभागाने सर्वाधिक 99.60% निकालासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर तिरुअनंतपुरमने 99.32% आणि चेन्नईने 97.39% निकालासह अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.

CBSE इयत्ता 12वी निकाल https://results.cbse.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर 2025 जाहीर झाला आहे.

Secondary School Examination (Class X) Results

CBSE Results Class 10th CBSE Board : बोर्डाच्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षा 2025 चे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपले निकाल DigiLocker च्या माध्यमातून सहज, जलद आणि सुरक्षितरित्या पाहता यावेत, यासाठी बोर्डाकडून सूचना जारी करण्यात आली आहे.

CBSE Results Class 10th CBSE Board

DigiLocker खाते आजच सक्रिय करा! नाहीतर शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

Alert: CBSE Class X & XII Results 2025 – Coming Soon!
Get ready to check your results quickly and securely via DigiLocker. Activate your account today to avoid last-minute hassle: cbseservices.digilocker.gov.in/activatecbse

DigiLocker वर निकाल पाहण्यासाठी लागणारी माहिती: CBSE ने यासंबंधी महत्वाची माहिती दिली आहे की, डिजीलॉकरमध्ये लॉगिन करण्यासाठी लागणारे ‘Access Code’ (सिक्युरिटी पिन) शाळांना दिले आहेत.

अ‍ॅक्सेस कोड म्हणजे काय?

CBSE ने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 6 अंकी सिक्युरिटी PIN तयार केला आहे. यालाच Access Code म्हणतात. याच्या मदतीने विद्यार्थी डिजीलॉकरमध्ये लॉगिन करून आपले शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षितरित्या पाहू शकतात. हा उपक्रम ‘परिणाम मंजुषा’ या डिजिटल प्रणालीचा एक भाग आहे, जो NeGD (National e-Governance Division) च्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.

आता निकालाची मार्कशीट, प्रमाणपत्र (Certificate) आणि Migration Certificate डिजिलॉकर (DigiLocker) या अ‍ॅपमध्ये तसेच CBSE Result Digilocker Gov in वर मिळणार आहे. CBSE बोर्ड तुमचं डिजिलॉकर खाते आधीच तयार करतं, पण ते वापरण्यासाठी ६ अंकी एक प्रवेश कोड (Access Code) लागतो. हा कोड मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं डिजिलॉकर अ‍ॅक्टिव्ह करून कागदपत्रं पाहू शकता. सविस्तर माहिती जाणून घ्या.

शाळांनी अ‍ॅक्सेस कोड कसा डाऊनलोड करावा?

CBSE ने प्रत्येक शाळेला त्याच्या डिजीलॉकर खात्यामधून विद्यार्थींचे अ‍ॅक्सेस कोड डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

डाउनलोड केलेला PIN सुरक्षितपणे प्रत्येक विद्यार्थ्याला द्या

  • https://digitallocker.gov.in या वेबसाईटला भेट द्या
  • “Login as School” हा पर्याय निवडा
  • CBSE LOC (List of Candidates) चे लॉगिन डिटेल्स टाका
  • “Download PIN File” वर क्लिक करा
  • Class 10 किंवा Class 12 निवडा

विद्यार्थी निकाल डिजीलॉकरवर कसा पाहतील?

निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी खालील स्टेप्स वापरून डिजीलॉकरवर आपले मार्कशीट पाहू शकतात:

  • CBSE कडून विद्यार्थ्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर SMS पाठवण्यात येईल, ज्यामध्ये लॉगिन डिटेल्स आणि अ‍ॅक्सेस कोड असतील.
  • त्यानंतर https://digitallocker.gov.in या वेबसाईटवर लॉगिन करा
  • अ‍ॅक्सेस कोड वापरून अकाउंट अ‍ॅक्टिवेट करा
  • Marksheet, Migration Certificate, आणि अन्य कागदपत्रे डिजिटल स्वरूपात डाउनलोड करा

Digilocker CBSE Result 2025 वरून गुणपत्रक कसे मिळवावे?

भारतातील CBSE शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक

आवश्यक गोष्टी:

  • शाळेचा कोड (School Code)
  • रोल नंबर (Roll Number)
  • 6 अंकी ऍक्सेस कोड (Access Code) – शाळेकडून मिळतो.

CBSE Result DigiLocker मध्ये पाहण्यासाठी या स्टेप्स Follow करा

  1. https://cbseservices.digilocker.gov.in/activatecbse या वेबसाईटला भेट द्या.
  2. सूचना वाचा आणि “Get Started with Account Confirmation” वर क्लिक करा.
  3. तुमची इयत्ता (X किंवा XII) निवडा.
  4. शाळेचा कोड, रोल नंबर, आणि ऍक्सेस कोड टाका. (उदाहरण: 012345 – फक्त आकडे लिहा)
  5. “Next” वर क्लिक करा.
  6. तुमचा मोबाइल नंबर टाका. (12वी साठी DOB देखील विचारले जाऊ शकते)
  7. तुमच्या मोबाइलवर आलेला OTP टाका आणि “Submit” करा.
  8. खाते यशस्वीरित्या सक्रिय झाल्यानंतर “Go to DigiLocker Account” वर क्लिक करा.
  9. निकाल घोषित झाल्यावर गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि स्थलांतर प्रमाणपत्र Issued Documents विभागात दिसेल.

महत्त्वाचे

  • आधीच DigiLocker वापरत असाल, तर Go to DigiLocker Account वर थेट जा.
  • जर सामान्य पद्धतीने खाते तयार केले असेल (वर दिलेल्या लिंकशिवाय), तर दस्तऐवज शोधून काढावे लागतील.

परदेशातील CBSE शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक

पर्याय 1: वेबसाइट वापरणे

  1. https://results.digilocker.gov.in/ या वेबसाइटवर जा.
  2. विचारलेली माहिती भरा आणि Submit वर क्लिक करा.
  3. ‘Click here’ वर क्लिक करा.
  4. Roll Number, DOB, Mobile Number, आणि Email टाका.
  5. तुमचे डिजिटल गुणपत्रक Email वर पाठवले जाईल.

पर्याय 2: सपोर्ट टिकीट

CBSE बोर्ड परिपत्रक येथे डाउनलोड करा

अधिकृत वेबसाईट : https://www.cbse.gov.in/

CBSE बोर्ड 10वी आणि 12वी निकाल 2025 कधी लागणार?

CBSE (Central Board of Secondary Education) बोर्डकडून दहावी व बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ याविषयीची अधिकृत घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशभरातून सुमारे 44 लाख विद्यार्थी CBSE बोर्डाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मागील वर्षीचा निकाल कधी लागला होता?

मागच्या शैक्षणिक वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, CBSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला होता.

📲 निकाल कुठे पाहता येईल?

विद्यार्थ्यांना CBSE बोर्डाचा निकाल खालील अधिकृत वेबसाइट्सवर पाहता व डाउनलोड करता येईल:

उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण लागतात?

  • 10वीचे विद्यार्थी – एकूण (थिअरी + अंतर्गत मूल्यांकन) मिळून किमान 33% गुण आवश्यक आहेत.
  • 12वीचे विद्यार्थीथिअरी आणि प्रॅक्टिकल वेगवेगळे 33% गुण असणे आवश्यक आहे.

कधी कधी विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी कमी गुण कमी पडल्यास CBSE बोर्ड ग्रेस मार्क्स (extra गुण) देऊ शकतो.

मार्कशीटमध्ये काय माहिती असेल?

CBSE च्या दहावी आणि बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मार्कशीटमध्ये खालील माहिती असेल:

  • विद्यार्थ्याचे नाव
  • विषयानुसार गुण (थिअरी + प्रॅक्टिकल)
  • एकूण गुण
  • पास/नापास स्थिती
  • अन्य शैक्षणिक तपशील
  • निकाल ऑनलाइन फक्त तात्पुरता (provisional) असतो. मूळ मार्कशीट शाळेतूनच घ्यावी लागते.

2025 परीक्षांबद्दल थोडक्यात:

  • CBSE दहावीची परीक्षा: 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान झाली.
  • यावर्षी दहावीच्या परीक्षेत 24.12 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते, जे 84 विषयांमध्ये परीक्षा देतात.

मागील वर्षीचा निकाल:

  • 12वीचा निकाल: 87.98% विद्यार्थी पास
  • 10वीचा निकाल: 93.60% विद्यार्थी पास (मागच्या वर्षीपेक्षा 0.48% वाढ)

त्यामुळे इयत्ता 10 वीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

RTE Admission Documents List 2026

आरटीई फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? पालकांनो ही यादी आताच तपासा!

January 13, 2026
Maharashtra Board Time Table 2026 Download

10 वी , 12 वी बोर्ड परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध, या तारखेपासून प्रॅक्टिकल आणि लेखी परीक्षा; अधिकृत वेळापत्रक पाहा

January 12, 2026
12th Board Exam Hall Ticket Released

12 वीचे हॉल तिकीट जाहीर! नावात चूक झाली किंवा हॉल तिकीट हरवल्यास ‘हा’ आहे सोपा उपाय

January 12, 2026
hsc hall ticket 2026 release date

प्रतीक्षा संपली! १२ वीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ‘या’ तारखेपासून मिळणार; बोर्डाची मोठी अपडेट

January 12, 2026
Maharashtra Scholarship Exam 2026 27

महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा ‘बदल’! नवीन ‘अधिसूचना’ जाहीर; पहा विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्ती’ची ‘रक्कम किती’ मिळणार? संपूर्ण माहिती

January 11, 2026
RTE Admission Process Information 2025 26

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे – ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती RTE Admission Process Information 2026 27

January 11, 2026

Leave a Comment