सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदाकडून 500 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध Bank Of Baroda Recruitment Peon

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of Baroda Recruitment Peon बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ही भारतातील एक नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. बँक ऑफ बडोदाकडून 2025 मध्ये ऑफिस असिस्टंट (Peon) पदासाठी देशभरात 500 रिक्त जागांसाठी www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती नियमित (Regular Basis) स्वरूपात असून सहायक (Subordinate) कॅडर अंतर्गत केली जाणार आहे. 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, भारतातील विविध राज्यांमध्ये स्थानिक भाषेच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

या भरतीद्वारे तरुणांना प्रतिष्ठित बँकेत काम करण्याची संधी मिळणार असून, अर्ज, पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती, आणि अर्ज प्रक्रिया यासंबंधी सर्व माहिती पुढील भागात सविस्तर दिली आहे.

Bank Of Baroda Recruitment Peon भरती संपूर्ण माहिती

पदांचा तपशील

पदाचे नाव : असिस्टंट (शिपाई) ASSISTANT (PEON)

शैक्षणिक पात्रता

  1. उमेदवार 10वी उत्तीर्ण (SSC / Matriculation) असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराला स्थानिक भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक आहे (उदाहरणार्थ: महाराष्ट्रासाठी मराठी)

पगार

सुरुवातीचा पगार: ₹19,500/- पासून सुरू होईल
इतर भत्ते: DA, HRA, मेडिकल, ट्रान्सपोर्ट, गटविमा, ग्रॅच्युइटी, पेंशन, घरकर्ज, कर्मचाऱ्यांचे कल्याण योजना इत्यादी.

एकूण रिक्त जागा तपशील

  • एकूण जागा: 500 (राज्यनिहाय रिक्त जागा तपशील जाहिरातीत दिली आहे. खाली दिलेली मूळ जाहिरात लिंकवरून डाउनलोड करा.)
Bank Of Baroda Recruitment Peon Vacancies

वयोमर्यादा (01 मे 2025 रोजी):

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 26 वर्षे
  • आरक्षित प्रवर्गांसाठी वयात सूट:
    • SC/ST: 5 वर्षे
    • OBC (NCL): 3 वर्षे
    • PwBD: 10 वर्षे
    • विधवा/ घटस्फोटित महिला: 35 ते 40 वर्षे (प्रवर्गानुसार)

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 3 मे 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 मे 2025
  • फी भरण्याची अंतिम तारीख: 23 मे 2025
  • ऑनलाइन परीक्षा: लवकरच जाहीर होईल
  • निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा + स्थानिक भाषेची परीक्षा (फक्त पात्रता चाचणी)

निवड प्रक्रिया

  1. ऑनलाइन परीक्षा (100 गुण – 80 मिनिटं):
विषयप्रश्नगुणवेळ
इंग्रजी भाषा252520 मिनिटे
सामान्य ज्ञान252520 मिनिटे
प्राथमिक गणित252520 मिनिटे
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)252520 मिनिटे
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

स्थानिक भाषेची परीक्षा (मराठी/ राज्यानुसार):

  • ही परीक्षा केवळ पात्रता स्वरूपात असेल (कोणतेही गुण नाहीत).

Bank Of Baroda Recruitment Peon अर्ज प्रक्रिया

अर्ज फी:

प्रवर्गफी
सामान्य/OBC/EWS₹600 + कर
SC/ST/PwBD/महिला/Ex-Servicemen₹100 + कर

कागदपत्रे

  • 10वी प्रमाणपत्र
  • फोटो ओळखपत्र (आधार, PAN, इ.)
  • जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
  • ईWS प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
  • Ex-Servicemen असल्यास सेवा/रिलीव्हिंग प्रमाणपत्र

अर्ज कसा कराल?

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://www.bankofbaroda.in
  2. Careers → Current Opportunities” या विभागात जाऊन अर्ज करा.
  3. तुमचा फोटो, सही, शैक्षणिक कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करा.
  4. अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट घ्या.

महत्त्वाच्या सूचना:

  • निवड झाल्यास कोणत्याही शाखेत पोस्टिंग मिळू शकते.
  • 6 महिन्यांची प्रोबेशन कालावधी राहील.
  • SC/ST/OBC/PWD उमेदवारांसाठी पूर्व परीक्षा प्रशिक्षण ऑनलाइन मोफत दिले जाईल.
  • उमेदवारांकडे CIBIL स्कोअर 650 पेक्षा जास्त असावा (जॉइनिंगवेळी लागेल).

संपर्क व सूचना: सर्व अपडेट्स व कॉल लेटर्स बँकेच्या वेबसाईटवरच मिळतील. मोबाईल व ई-मेल सतत तपासा.

टीप: ही जाहिरात एकूण पदसंख्या, पात्रता व भरती प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी आहे. सविस्तर तपशीलासाठी मूळ PDF जाहिरात बघावी.

महत्वाच्या लिंक

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!