GMC Nanded Recruitment आरोग्य विभागांतर्गत जाहिरात प्रसिद्ध, 10 वी पास उमेदवारांना पर्मनंट नोकरीची मोठी संधी! संपूर्ण माहिती

Published On: May 6, 2025
Follow Us
GMC Nanded Recruitment

GMC Nanded Recruitment वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट क (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतची जाहिरात www.drscgmcnanded.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.

GMC Nanded Recruitment संपूर्ण माहिती

GMC Nanded अंतर्गत गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली असून, 26 एप्रिल 2025 ते 16 मे 2025 या कालावधी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

रिक्त पदांचा तपशील

  • गट-ड (वर्ग ४) सर्व संवर्ग: ६९ पदे  
  • गट-ड (वर्ग ४) प्रयोगशाळा परिचर: १७ पदे  
  • एकूण पदे: ८६

वेतनश्रेणी

  • गट-ड (वर्ग ४) सर्व संवर्ग: एस-१: १५००० – ४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते  
  • गट-ड (वर्ग ४) प्रयोगशाळा परिचर: एस-६: १९९०० – ६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
GMC Nanded Recruitment Vacuncy

आरक्षण:

शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण लागू राहील. यात महिला, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) इत्यादी आरक्षण समाविष्ट आहे. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक अर्हता

वयोमर्यादा (२४/०४/२०२५ रोजी)

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: १८ ते ३८ वर्षे  
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी: १८ ते ४३ वर्षे (नॉन क्रिमिलेअर गटात मोडणाऱ्यांसाठी वयाची सवलत लागू नाही)  
  • पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी: कमाल ५५ वर्षे  
  • स्वतंत्र सैनिकांचे पाल्य, जनगणना कर्मचारी, निवडणूक कर्मचारी: कमाल ४५ वर्षे  
  • खेळाडू उमेदवारांसाठी: ५ वर्षांपर्यंत सूट, कमाल ४३ वर्षे  
  • दिव्यांग उमेदवारांसाठी: कमाल ४५ वर्षे (किमान ४०% दिव्यांगत्व आवश्यक)  
  • प्रकल्पग्रस्त आणि भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी: कमाल ४५ वर्षे  
  • माजी सैनिक उमेदवारांसाठी: सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक ३ वर्षे, दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल ४५ वर्षे  
  • ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी कमाल वयोमर्यादेत २ वर्षांची अतिरिक्त शिथिलता.

निवड प्रक्रिया – परीक्षेचे स्वरूप

  • परीक्षा ऑनलाईन (COMPUTER BASED TEST) पद्धतीने होईल.  
  • प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील.  
  • प्रत्येक प्रश्नाला ०२ गुण असतील.  
  • परीक्षेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) च्या दर्जा समान राहील.  
  • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बोध्दीक चाचणी/अंकगणित या विषयांवर प्रत्येकी ५० गुण, एकूण २०० गुणांची परीक्षा होईल.  
  • परीक्षेचा कालावधी २ तास (१२० मिनिटे) असेल.  
  • गुणवत्ता यादीत येण्यासाठी किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.  
  • मुलाखती घेण्यात येणार नाहीत.

NMC Bharti 2025: Medical Officer, Staff Nurse, MPW-Male पदांची जाहिरात प्रसिद्ध! संपूर्ण माहिती

GMC Nanded Recruitment अर्ज प्रक्रिया

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.  
  • अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे.  
  • परीक्षा केंद्राचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती स्वीकारली जाणार नाही.

अधिकृत जाहिरात पीडीएफ येथे डाउनलोड करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33031/93557//Index.html या संकेतस्थळास भेट द्या.

अधिक माहितीसाठी https://www.drscgmcnanded.in या संकेतस्थळाला भेट द्या.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment