Vidyut Sahayak Result 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO) ने विद्युत सहाय्यक (परिवहन) या कंत्राटी पदासाठी तात्पुरती निवड व वेटिंग यादी (Provisional Select & Wait List) आज जाहीर केली आहे.
idyut Sahayak Result 2025
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO – MSETCL) ने विद्युत सहाय्यक (परिवहन) या कंत्राटी पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील तात्पुरती निवड व प्रतीक्षा (Wait) यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही यादी 03 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेवर आधारित असून, उमेदवारांच्या गुणवत्तेचा विचार करून तयार करण्यात आली आहे.
या यादीमध्ये दोन जाहिरात क्रमानुसार उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे:
- जाहिरात क्र. 08/2024 – विद्युत सहाय्यक (परिवहन) – कंत्राटी पद
- जाहिरात क्र. 10/2023 – विद्युत सहाय्यक (परिवहन) – अनुसूचित जमातींसाठी विशेष मोहीम (ST Special Drive)
महत्त्वाच्या सूचना व अटी
- या यादीतील निवड तात्पुरती आहे. अंतिम नियुक्ती ही उमेदवाराने सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व पात्रता सिद्ध केल्यानंतरच होईल.
- निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना स्वतंत्रपणे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. याची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर किंवा ई-मेलद्वारे दिली जाईल.
- उमेदवारांनी सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करूनच पडताळणीला यावे.
- जर उमेदवाराने चुकीची माहिती दिली असेल, किंवा अयोग्य कागदपत्रे सादर केली, तर त्याची उमेदवारी तत्काळ रद्द केली जाईल.
- उमेदवाराने अर्जात दिलेला तपशील, पात्रता आणि कागदपत्रांची 03.02.2025 ह्या कट ऑफ तारखेला वैधता असणे आवश्यक आहे.
- वेटिंग यादीतील उमेदवारांचा विचार फक्त निवड यादीतील उमेदवार अपात्र ठरल्यास किंवा अनुपस्थित राहिल्यास केला जाईल.
- ही यादी तारीख 06.05.2025 पासून पुढील एक वर्षासाठी वैध राहील.
- ही यादी नियुक्तीची कोणतीही हमी देत नाही. अंतिम निर्णय कंपनीकडून घेतला जाईल.
Vidyut Sahayak Result 2025 निवड व प्रतीक्षा यादी डाउनलोड करा
जाहिरात क्र. | निवड यादी (Select List) | वेटिंग यादी (Wait List) | गुण यादी (Mark List) |
---|---|---|---|
08/2024 | Annexure ‘A’ | Annexure ‘B’ | Annexure ‘C’ |
10/2023 | Annexure ‘D’ | Annexure ‘E’ | Annexure ‘F’ |
निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि Team MSETCL मध्ये स्वागत! पुढील कागदपत्र पडताळणी व नियुक्तीबाबतची माहिती लवकरच कंपनीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.
अधिकृत वेबसाईट : https://www.mahatransco.in/
