NHM मधील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी सेवेचा लाभ; वेतन निश्चितीचे नियम बदलले – शासन निर्णय जारी

Published On: July 7, 2026
Follow Us
NHM Contract Employee Regularization

राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेल्या आणि १० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी, यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार वाहन चालकांना वेतनश्रेणी कोणती लागू करावी? बाबत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे.

कंत्राटी वाहन चालकांच्या वेतन निश्चितीच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना कोणती वेतनश्रेणी मिळणार? याबबात स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. सविस्तर वाचा

या निर्णयामुळे NHM Contract Employee Regularization प्रक्रियेतील अडथळे दूर होऊन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वेतन निश्चितीच्या निकषात काय बदल झाला? 

यापूर्वी ४ डिसेंबर २०२४ च्या आदेशानुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समायोजन करताना वेतन निश्चितीसाठी एक क्लिष्ट पद्धत वापरली जात होती, ज्यामध्ये सध्याचे मानधन आणि त्यावर एक वेतनवाढ (Increment) मिळवून वेतन निश्चिती केली जात असे व त्याला शासनाची मान्यता आवश्यक होती. मात्र, आता या पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.

नवीन सुधारित आदेशानुसार, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी वाहन चालकांचे नियमित पदी समायोजन करताना, त्यांना लगतच्या मागील महिन्यात प्राप्त होणाऱ्या मानधनाएवढ्या नियमित वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सोप्या भाषेत सांगायचे तर, कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या शेवटच्या मानधनाच्या आधारावर त्यांना नियमित वेतनश्रेणीत समाविष्ट केले जाईल. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. डाउनलोड लिंक शेवटी दिलेली आहे.

कार्यालय प्रमुखांना मिळाले अधिकार

या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या वेतन निश्चितीसाठी आता मंत्रालयातून किंवा शासनाकडून वेगळ्या मान्यतेची गरज भासणार नाही.

सुधारित आदेशानुसार, सदर वेतन निश्चितीला मान्यता देण्याचे अधिकार आता थेट संबंधित कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत.

यामुळे NHM Contract Employee Regularization अंतर्गत होणारी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागणार आहेत.

जुना आदेश रद्द

या विषयाच्या अनुषंगाने १८ सप्टेंबर २०२५ रोजी काढण्यात आलेल्या आदेशातील परिच्छेद क्रमांक २ मधील सूचना या नवीन आदेशान्वये रद्द करण्यात आल्या आहेत, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव अनिल वि. सावरे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला असून, यामुळे १० वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या वाहन चालकांच्या नियमितीकरणाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे.

शासनाच्या या सकारात्मक पाऊलामुळे NHM Contract Employee Regularization धोरणाची अंमलबजावणी अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक माहितीसाठी : NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीबाबतचा २६ डिसेंबर २०२५ चा सविस्तर शासन निर्णय (GR) वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

NHM कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार कोणती वेतनश्रेणी लागू होणार? चेक करा

अधिसंख्या पदावर समायोजन GR

मूळ शासन निर्णय (GR) डाऊनलोड करा

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन; सुधारित शासन निर्णय निर्गमित

शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

nhm-contract-employees-salary-pay-scale-gr-2026

NHM कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार कोणती वेतनश्रेणी लागू होणार? चेक करा

August 4, 2026
samagra shiksha contractual employees Regularization gr

राज्य सरकारचा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दूसरा मोठा निर्णय! समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्याबाबत शासन निर्णय जारी

August 4, 2026
contractual employee regularization

या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! शासकीय सेवेत सामावून घेण्यासह इतर मागण्याबाबत GR निर्गमित

August 3, 2026
nhm contractual employees regularization

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष समायोजन कधी होणार? शासनाच्या नव्या पत्रामुळे वाढल्या अपेक्षा; पुढची प्रक्रिया काय?

July 17, 2026
NHM Contract Employees 30 jun gr

NHM कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अधिसंख्य पदांवर शासन सेवेत समायोजन; शासन निर्णय जारी

July 17, 2026
daily-wage-workers-gratuity-rights

अखेर! या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे उपदान, व्याजासह थकबाकी मंजुर, शासन निर्णय जारी

July 17, 2026

Leave a Comment